• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार, कच्छ युवक संघ,रोटी डे ग्रुप,व लेडीज एक्सप्रेस चे स्तुत्य उपक्रम कल्याण येथे गरजू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा संपन्न.

Jun 25, 2025

Loading

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार,
कच्छ युवक संघ,रोटी डे ग्रुप,व लेडीज एक्सप्रेस चे स्तुत्य उपक्रम

कल्याण येथे गरजू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा संपन्न.

*स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून समाजाच्या विकास करण्यासाठी शिक्षणात प्रगती करणे आवश्यक आहे: वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयजी सावकारे.*

( *महाराष्ट्राचे वस्त्र उद्योग मंत्री मा.ना.श्री.संजयजी सावकारे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप,गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा व समाजातील तळगातील गरजू लोकांना मी स्वार्थ व उदार हे भावनेतून मदत करणाऱ्या रोटी दे ग्रुपचे डॉ.नितीन चंदिया, कच्छ युवक संघाचे डॉ .तरुण नागडा, स्वामीनारायण ग्रुपचे डॉ दिनेशभाई ठक्कर, लेडीज एक्सप्रेस ग्रुपच्या मधूबेन ठक्कर, बीके बिर्ला महाविद्यालयाचे उपप्राचार्य आयुष्य दुबे, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी या समाजसेवकांच्या विशेष सन्मान करण्यात आला.)*

ठाणे: कल्याण(प्रतिनिधी)
कल्याण येथील स्वामीनारायण हॉल मध्ये,आपले प्रतिष्ठानचे संघाचे प्रमुख मा.नगरसेवक, समाजसेवक अनिल काकडे यांचा प्रयत्नातून,महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना.श्री.संजय सावकारे यांचा हस्ते, मा.आमदार नरेंद्र पवार, बी.के.बिर्ला महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरिष दुबे, मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मणिलाल शिंपी, रोटी डे ग्रुपचे प्रमुख डॉ. नितील चंदेया, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ दिनेशभाई ठक्कर,कच्छ युवक संघाचे प्रमुख डॉ.तरुण नागडा,यांचा प्रमुख उपस्थितीत मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार
रोटी डे ग्रुप, कच्छ युवक संघ, लेडीज एक्सप्रेस ग्रुपचा तर्फे , गरजू,गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच समाजसेवेचा वसा घेऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा संकल्पनेनुसार, रोटी डे ग्रुप चे प्रमुख डॉ. नितीन चंदिया, कच्चे युवक संघाचे प्रमुख डॉ. तरुण नागडा, बीके बिर्ला महाविद्यालयाचे उपकार झाले हरीश दुबे, स्वामीनारायण हॉलचे संचालक उदार दानशूर व्यक्तिमत्व डॉ. दिनेश भाई ठाकर यांचासह महाराष्ट्र राज्य मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख तथा रस्ता सुरक्षा अभियान आर एस पी चे विभागीय समन्वय अधिकारी ( नोडल ऑफिसर) डॉ. मनिलाल शिंपी यांच्या सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक व अभिनंदन करत महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना.श्री. संजयजी सावकारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकातून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन करून आपल्या समाजाची प्रगती व विकास कसा होईल यासाठी नियमित अभ्यास करणे व स्पर्धात्मक युगात टिकून राहणे यासाठी अभ्यासूवृत्ती जोपासणे गरजेचे आहे तसेच रोटी ग्रुप, कच्चे युवक संघ,लेडीज एक्सप्रेस ,महाराष्ट्र राज्य मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, मार्फत जे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे व समाजातील भागात विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा ओळखून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अत्यंत राबवीत आहेत त्याबद्दल त्यांनी या सर्व समाजसेवकांचे कार्य अतिशय स्तुत्य व अभिमानास्पद आहे अशा शब्दात समाजसेवी ग्रुप मार्फत कार्य करणाऱ्या समाजसेवकांच्या कार्याच्या गौरव करत अभिनंदन केले. हा सर्व कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आपले प्रतिष्ठान चे प्रमुख अनिल काकडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून अनिल काकडे हे नेहमी समाजातील तळागाळातील विद्यार्थी, कामगार तरुण-तरुणी यांच्या हितासाठी व विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहून विविध उपक्रम राबवत असतात. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन आपले प्रतिष्ठानचे प्रमुख अनिल काकडे यांनी केले होते. तसेच समाजातील गरजू व गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गणवेश उपलब्ध करून देणारे रोटी डे ग्रुप चे प्रमुख डॉ.नितीन चंदिया, कच्चे युवक संघाचे डॉ.तरुण नागडा, स्वामीनारायण ग्रुपचे डॉ. दिनेशभाई ठक्कर, लेडीज एक्सप्रेस ग्रुपच्या प्रमुख मधुबेन ठक्कर, निस्वार्थी व उदार हेतूने गोरगरिबांचे सेवा करणाऱ्या समाजसेविका शशीबेन शेट्टी तसेच मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख व रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्या बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed