व्यथा हि “अपंग विकास संघर्षाची” खडतर प्रवासातून उज्वल भविष्याकडे !
आपणासर्वांसमोर आज एका ग्रामीण भागात घडत असलेली सत्य व्यथा मांडत आहोत. ती आहे. कठिण, खडतर, प्रवासातून आपली यशाची पाऊलवाट अत्यंत हिमतीने, सर्वांच्या मदतीने यशोगाथा गाठीत असलेल्या व्यक्तीची.
मा.श्री. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी अपंगांचा विकास करण्यासाठी उचलले. यासाठी त्यांनी शिरपुर येथे मुकबधीर निवासी शाळेत “सफाईगार” म्हणून नोकरी स्विकारली व अत्यंत ईमाने, इमानदारीने या अपंग सेवेला सुरुवात केली. घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आण्णांचे संस्थेचे अध्यक्ष यांचेहि घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे या मुकबधिर निवासी मुलांसाठी दोन वेळच्या जेवणासाठी सोय, गावातून धान्य जमा करून, मुलांची व्यवस्था करण्यापासून सुरुवात होती. रोज अमळनेर ते शिरपूर प्रवास शक्य होत नव्हता. घरी कर्ता व्यक्ती कोणी नव्हता. नविन संसाराची वेल फुललेला असून देखील चिंता फक्त “अपंग मुलांची सेवा हीच होती. प्रवासाच्या भाड्यासाठी पैसे राहात नव्हते. तरी पण मिळेल त्या वाहनावर प्रवास करून वेळेवर हजर राहावे असा सरांचा (अण्णांचा) नियम असे. यानंतर शाळेतच निवासी राहाण्याची व्यवस्था अण्णांनी करण्याचा निर्णय घेतला. व त्याची अम्मलबजावणीही केली. असे करत करत सफाईगार ते कलाशिक्षक पर्यंत अण्णांचा प्रवास झाला. तोही त्यांची जिद्द, मेहनत, श्रम विश्वास यामुळेच, पण अण्णांना तेथेच थांबायचे नव्हते. अण्णांचे सहकारी व वरिष्ठ साहेब, तसेच अण्णांचे गुरु श्री. एस. के. सोनवणें सर यांनी पाठबळ दिले व सांगितले की, तुझ्यामध्ये एवढी कार्यक्षमता असून तू ही अपंग मुलांसाठी शाळा सुरु कर. अण्णांच्या गुरुंनी सल्ला दिल्यानंतर अण्णांना एक भक्कम पाठबळ मिळाले. व अण्णांनी जळगांव जिल्ह्यात” अपंग मुलांच्या शाळांचे सव्र्व्हेक्षण सुरु केले. रोजचा प्रवास हा अमळनेर, शिरपुर, धुळे, पारोळा याप्रमाणे चालत असे. व सर्व्हेक्षणा नुसार अमळनेर पासून २० कि. मी. अंतरावर पारोळा येथे ‘मानसिक अपंग’ मुलांची संख्या जास्त होती पण तेथे ‘मतिमंद’ मुलांसाठी एकही शाळा नव्हती. अण्णांनी ठाम निश्चय केला. व आपलं कार्यक्षेत्र आता पारोळा हेच राहिल व कार्याला सुरुवातही केली.”
अण्णांनी (योगेश महाजन सरांनी) पारोळा येथेच एक वही घेतली. व तेथुनच “मतिमंद मुलांचे सव्र्व्हेक्षण सुरु केले. असे करत असतांना अगदी हृदयाला हलवून सोडणारी परिस्थिती योगेश महाजन सरांना दिसली. कि हि मतिमंद मुले मंदिरासमोर भिक मागत होती, तर काही उकिरड्यावर प्लास्टिक, भंगार वेचत होती तर काही मुले फेकलेले अन्न, उष्ट अन्न जमा करून खातांना निदर्शनास आली. व पालकांना आपल्या पोटच्या गोळ्याबद्दल किती घृणा आहे. हि सत्यपरिस्थिती निदर्शनास आली.”
यापुढचा प्रवास खूप भयानक दिसून आला. तो म्हणजे ‘इब्राहिम’ नावाचा मुलगा याला साखळीने पलंगाला बांधून ठेवलेले होते. त्याला एका जनावरा प्रमाणे बांधलेले होते. अण्णांनी त्याची बांधलेली साखळी सोडली. त्याच्या पालकांना समजावले व त्याला “अण्णांच्या स्वतःच्या शाळेत दाखल केले. तसेच भारती नामक मुलीच्या घरी अण्णा गेले असता. मुलीच्या आईने अण्णांना शिवीगाळ केली. व चप्पलही मारून फेकली पण अण्णा कुठेही डगमगले नाही. शेवटी मुलीची आई ती. मुलीला लग्नाला अडचण निर्माण होईल म्हणून तिला सत्य लपवूनच ठेवायचे होते. पण सरांनी त्यांना धिर दिला. व भारतीच्या ‘आई व वडील यांना डॉक्टरांजवळ” सायकोलॉजीस्ट यांना दाखवले. तेव्हा आई वडील यांना डॉक्टरांनीच सांगितले की तुमची मुलगी ही मतिमंद आहे. व तिला विशेष शाळेतच दाखल करावे लागेल. व तेव्हापासून पालकांचा विश्वास वाढला व अण्णांची स्विकारवेला चॅलेंज अजून वाढला. आता भारती हि सर्वसामान्य मुलींप्रमाणे स्वतःची कामे स्वतः करु शकते.यानंतर पुढची परिस्थिती ही अगदीच वेगळी दिसून आली. योगेश म्हणून एक विद्यार्थी याला पायाने चालता येत नाही. म्हणून त्याला त्याचे पालक यांनी तगारी मध्ये बसवत होते. योगेशला अण्णांनी शाळेत दाखल केले. व त्याला जॉगरवर चालण्याचा सराव सुरु ठेवला आज ‘योगेश’ हा स्वतंत्रपणे चालतो.
असे विविध दृश्य समोर येत राहिले व अण्णा त्याला सामोरे जातच राहिले. व दि. २७/४/२००५ रोजी पासून “अण्णांचे स्वप्न साकार झाले. व तेही परिश्रम मतिमंद मुलांचे विद्यालय, पारोळा” या नावाने पारोळा येथे मडक्या मारोती शेजारी डॉ. भुरे यांच्या घरामध्ये भाडेतत्वावर तीन खोल्या ५ हजार प्रति महिना याप्रमाणे अण्णा स्वतः विद्यार्थ्यांना पायी घेऊन येत असत. सुरुवातीला अण्णा हेच मुख्याध्याप शिपाई व काळजीवाहक, सफाईगार अशा भुमिका स्वतः पार पाडत होते. वर्ग खोल्या स्वतः उघडायच्या स्वतः वर्गखोल्या झाडायच्या व पुसायच्या असा नित्यनियम रोजचा असे. कुठलेही शासकीय अनुदान नाही स्वतःच्या हिमतीवर व समाजाच्या आशिर्वादाने हे गोपनीय कार्य सुरु होते दिवसेंदिवस या सेवेसाठी हात पुढे येऊ लागले. कर्मचारी वाढत होते विद्यार्थीही खूप प्रमाणात वाढत होते. व म्हणून अण्णांनी भाड्याची खोली सोडून यामुलांकरिता निसर्गाच्या सनिध्यात व अध्यात्मिकतेच्या जवळ शाळा स्थापण्याचा निर्णय घेतला व अण्णांनी अमळनेर रोड, देवी पद्मावती नगर, पारोळा येथेच पैसे व्याजाने व वडीलांच्या पेंशनमधून स्वतः दहा स्के. फूट जागा घेतली. व तेथे शाळा बांधण्याचा निर्णय ठाम केला. आर्थिक व्यवस्था अगदी दुर्बल पण तरीही मनात दृढ निश्चय हाच कि शाळेची ईमारत ही उभी करायचीच मग बांधकामाला रेती, दगड, सिमेंट, विटा, लोखंड या वस्तु आणायच्या कशा सिमेंटची एक गोणी मुश्किलने पैसे जमवा जमव करून आणली जात होती. व तीही संपली कि मिस्तरी वर्ग काम बंद करून निघून जात पाया बांधणीसाठी दगड आणायचा कुठून बांधकामासाठी पाणीची व्यवस्था नव्हती हा अगदी बिकट प्रश्न होता. आणि म्हणून ओळख व परिचयातून विहीर खोदण्यात आली. व यामध्ये सुरुवातीपासून दगड लागला. सुरुवातीला काही थोड्या अंतरावरुन अण्णा स्वतः कावडने पाणी वाहात व ते पाणी गौशाळेतील गायी, झाडांना व मुलांना अशी व्यवस्था होत होती. आताही पाणी सायकलीवर आणले जाते. विहीरचा दगड फोडण्यास मिस्तरी तयार नव्हते. आम्ही याला हात लावणार नाही. तुम्ही मजूर लावा नाही तर विकत आणा-अण्णांनी जरा वेळ विचार केला व ठामपणे ठरवून टाकले. कि आम्ही हा दगड फोडून तुम्हाला देऊ. सुरुवात अण्णांनीच केली. आणि मग शाळेच्या टाईमा व्यतिरीक्त कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन हातात हाथोडा घेऊन दगड फोडला जाई व मिस्तरी त्याला हात लावीत.
असे करत करत शाळेचे ईमारतीचे बांधकाम टप्प्याटप्प्याने होत राहिले. आमच्या शाळेतील विद्यार्थी चि. लखन हिरामण चौधरी याची मा. राष्ट्रपती यांना भेटीसाठी १४ नोव्हें २००७ रोज निवड झाली. ही आमच्या करिता खूप मोलाची गोष्ट होती या विद्यार्थ्यांला स्वतः अण्णा घेऊन गेल होते. “राष्ट्रपती भवनात या विद्यार्थ्यांने त्याची दिनचर्या अपूर्ण राहिल्याने त्याने कार्यक्रमाच्या सुन होण्याच्या वेळेस करून दिली. व अण्णांनी त्यावर मायेची फुंकर म्हणून त्याची शी-सु धुऊन दिल नविन कपडे घालून दिले. व त्याला अगदी स्वच्छ केले. व डोक्यावरून हात फिरवून सांगितले नि तू कुठलीच चुक केली नाही. दिवसेंदिवस मुलांची संख्या वाढतच होती. व पालकांना मुलांना रो ने-आण करणे शक्य नव्हते, आणि म्हणून अण्णांनी ठरवले की आपण निवासी वसतिगृह सु करु. आणि ठरलं, निवासी व्यवस्था सुरु झाली. पण एक अति महत्वाचा प्रश्न समोर उ राहिला. तो म्हणजे दोन वेळच्या जेवणाचा व तेथेही न डगमगता अण्णांनी ठरवले की आपण ए झोळी घेऊन गावातील किराणा दुकान, आडत दुकान, व ग्रामीण भागातील घरांमधून धान्य जा करायच व त्यातून मतिमंद मुलांचे दोन वेळची जेवणाची समस्या सोडवायचा व त्याचप्रम सुरुवातही झाली. लोकांचा प्रतिसाद ही मिळायचा, कोणी पायरीवरुन खालीही उतरवून असत पण अण्णांनी हिंमत खचू दिली नाही. आज आई-वडील, भाऊ नातेवाईक, गल्लीतील ल यांच्यावर ओझं वाटत असलेली हि मुले आज, स्वतःचे स्वतः दैनंदिन कामकाज कराय लागलेत. इंग्रजी Poem पाढे, अंक, रंग, कलात्मक वस्तु, फिनाईल बनवून त्यातूनही शाळे मदत मिळवून देता आहेत. व पालक या मुलांच्या दाढी, कटिंग, वर होणारा खर्चही करत ना कारण हा एकच हा आम्हाला काय पगार आणून देतो का? यासाठी या मुलांच्या दाढी व क अण्णा स्वतः व आमचे सर्व सहकारी कर्मचारी स्वतः करतात. आज मुलांसाठी संपुर्ण गावातील मेडिकल्स वरुन औषध गोळ्या फ्रि मिळतात. गावातील डॉक्टर मुलांकडून कोणतीही फि घेत नाही. प्रतिष्ठित व्यक्तीपासून ते सामान्य कुटूंबापर्यंतची व्यक्ती शाळेत यथाशक्ती प्रमाणे धान्य देतात. दिवसांमागून दिवस बदलत जात आहे. व शाळेतील प्रसन्न वातावरण भेट देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींच्या प्रोत्साहन व प्रेरणा यामुळे फुलून जात आहे. आज आमच्या परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा हि ६६ विद्यार्थ्यांची दि. २७/४/२००५ पासुन ते आतापर्यंत हि कायमस्वरुपी विना अनुदान तत्वावर काम करीत आहेत. पण या शाळेत काम करणारे कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज दिसते. कारण चार धाम, काशी, पंढरपूर सर्व आमच्या समोर आहे. आणि अपंगाची सेवा हिच ईश्वर सेवा यामुळेच.आज या शाळेतील कर्मचारी यांना कोणतेही मानधन मिळत नाही. पण दर महिन्याला प्रोत्साहन, प्रेरणा, मनोबल, साहस आत्मविश्वास, सहनशक्ती, परिश्रम हे मिळते व ह्या सर्व बाबी पैसा पेक्षा महत्वाच्या आहेत. कामालाच सर्वस्वी मानणारे आमचे परिश्रम कुटूंबातील सहकारी कर्मचारी दिवसरात्र अतोणात काम इमानदारी, निस्वार्थ सेवा देत आहे. आज आमच्या शाळेला भेट देण्यासाठी सौ. सिंधूताई सपकाळ (अनांथाची आई) माई व मा.श्री. प्रकाश आमटे आणि अनेक पदाधिकारी व समाज सेवक निलीमा मिश्रादिदी येवून गेलेत. याप्रमाणे संस्थेची वाटचालीचा खडतर प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत असाच सुरु ठेवण्याचा दृढ निश्चय अण्णांनी म्हणजेच श्री. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी केलेला आहे. तसेच अण्णां लोकांकडून जुने कपडे घेततात आदिवासी, गरीब लोकांना वाटप करतात. आणि असाच या मानसिक अपंग विद्यार्थ्यांचे पुनर्वसन कितपत जास्तीत जास्त करता येईल आणि रोजगार उपलब्ध करू शकतील. आणि आपल्या परिवाराला हातभार लाभेल आणि त्यांच्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी बदलेले हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन पुढील कार्य चालत राहील.
आण्णासाहेब
नवे क्षितीज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सूर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
🎂💐🎂🎂
मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद परिश्रम मतिमंद निवासी शाळा पारोळा