• Sat. Jul 5th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सावित्रीची लेक शिक्षणाचे व्रत हाती घेत, आदर्श भावी पिढी घडविणार्‍या, आणि सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा पुढे चालविणार्‍या अनुपमाताई जाधव यांच्याविषयी…

Jun 26, 2025

Loading

सावित्रीची लेक शिक्षणाचे व्रत हाती घेत, आदर्श भावी पिढी घडविणार्‍या, आणि सावित्रीबाई फुले यांचा समृद्ध वारसा पुढे चालविणार्‍या अनुपमाताई जाधव यांच्याविषयी…

 

 

साहित्यस्नेही शिक्षिका अनुपमाताई जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

अमळनेर प्रतिनिधी –
साहित्य, शिक्षण आणि संस्कार यांची निस्सीम साधना करणाऱ्या अनुपमा जाधव या उपक्रमशील, संवेदनशील शिक्षिकेचा २७ जून रोजी वाढदिवस… मात्र तो एक केवळ तारखेपुरता साजरा होणारा दिवस नाही, तर तो त्यांच्या सृजनशीलतेचा, संस्कृतीप्रेमाचा, आणि सौंदर्यदृष्टीचा उत्सवच म्हणावा लागेल.
नावाप्रमाणेच अनुपम—अनुपमा जाधव या शिक्षिका, कवयित्री आणि लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपल्या लेखणीतून निसर्ग, नाती, संस्कार, विद्यार्थ्यांचे मनोगत आणि समाजाचे वास्तव यांना सुंदरपणे शब्दबद्ध केले आहे. त्यांच्या कवितांना आणि लेखनाला दुरदर्शनवर मुलाखतीच्या माध्यमातून मिळालेला सन्मान ही त्यांच्या प्रतिभेची पावतीच म्हणावी लागेल.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित, तरी मनात नम्रतेचा ठेवा!
शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांशी त्यांचा सहवास म्हणजेच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि संवेदनशीलतेचा अनुभव असतो. त्यांनी विविध पदांवर काम करतांना आपल्या कार्यतत्परतेचा ठसा उमठवला असूनही कधीही अहंभावाची छाया त्यांच्या स्वभावात जाणवत नाही.
साहित्य सृजनात रमलेली ही शब्दवीरांगना…
कविता, कथा, ललित लेख या साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या सृजनशीलतेतून उमटलेले शब्द म्हणजेच एक निर्मळ झऱ्याचा नाद, एक नवी पहाट… विद्यार्थ्यांपासून ते साहित्यरसिकांपर्यंत त्यांच्या लेखणीने असंख्य मनांना स्पर्श केला आहे.
मैत्री म्हणजे त्यांचं दुसरं नाव…
‘फुलवेडी मैत्रीण’ अशा विशेषणाने गौरवली गेलेली अनुपमाताई जाधव या केवळ शिक्षिका किंवा लेखिका नाहीत, तर त्या एक जिव्हाळ्याची बहीण, सतत दुसऱ्यांसाठी तत्पर राहणारी, माणुसकीच्या गाभाऱ्यातून मैत्रीची शब्दांपलिकडील नाती फुलवणारी व्यक्तिमत्त्व आहे.
शिक्षण, साहित्य आणि संवेदनशीलतेचा त्रिवेणी संगम म्हणजेच अनुपमाताई जाधव.
२७ जून या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ‘मराठी लाईव्ह न्यूज’ तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी अनेक प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव…
मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी
निर्माण करणारा हा वाढदिवस
जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही
अशा या मनपसंद दिवशी
सुखांची स्वप्ने सफल होऊन अंतरंग
आनंदाने भरून जावे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

✍️ – ईश्वर आर. महाजन
(पत्रकार, अमळनेर)
986035296

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *