दैवगिरी प्रांत संस्कृत विषयाची प्रचार प्रसार सभा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी: संस्कृत भाषा विषयाची संस्कृतभारती देवगिरी प्रांताची प्रचार-प्रसार सभा दि. ४ जुलै २०२५ शुक्रवार रोजी लोकमान्य विद्यालय, अमळनेर या ठिकाणी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला भुसावळ येथील संस्कृतचे मार्गदर्शक श्री. चिपळूणकर सर यांची खास उपस्थिती होती. यासह संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्र.ज. जोशी सर, डी.डी.पाटील सर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी चिपळूणकर सर यांनी संस्कृतचा प्रचार-प्रसार कसा होईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रा.डॉ.प्र.ज.जोशी यांनी आधीच संस्कृत विषयाचे काम हाती घेतले आहे, व ते संस्कृतसाठी नवनवीन गोष्टी कशाप्रकारे करतो याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा जोशी यांनी केले. या कार्यक्रमाला अमळनेर येथील सर्व शाळेतील संस्कृत शिक्षिका उपस्थित होत्या. यामध्ये नेतकर मॅडम, जावरे मॅडम, बागुल मॅडम, भावसार मॅडम, संगीता पाटील, कुलकर्णी मॅडम, सौ. रहान मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार देवयानी भावसार यांनी केले. नंतर संस्कृत प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.