वाढदिवस साजरा झाला अनोख्या पद्धतीने – विशेष मुलांना मिष्टान्न भोजन, प्रेरणादायी उपक्रमाने सर्वांचे मन जिंकलं!”
1 min read

वाढदिवस साजरा झाला अनोख्या पद्धतीने – विशेष मुलांना मिष्टान्न भोजन, प्रेरणादायी उपक्रमाने सर्वांचे मन जिंकलं!”

Loading

वाढदिवस साजरा झाला अनोख्या पद्धतीने – विशेष मुलांना मिष्टान्न भोजन, प्रेरणादायी उपक्रमाने सर्वांचे मन जिंकलं!””

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
लोकमान्य विद्यालय, अमळनेरचे मुख्याध्यापक व क्षत्रिय काचमाळी समाज अमळनेरचे अध्यक्ष मा. श्री मनोहर भगवान महाजन व सामाजिक कार्यकर्त्या ताईसाहेब सौ. रंजना मनोहर महाजन यांचे चिरंजीव डॉ. हिमांशू मनोहर महाजन (आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी, पारोळा) यांच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत स्तुत्य आणि समाजप्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्था, धुळे संचलित “परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा” येथे डॉ. हिमांशू महाजन यांच्या वतीने विशेष विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनासाठी 5100/- रुपये देणगी देण्यात आली. वाढदिवसाच्या दिवशी खास कार्यक्रमाचे आयोजन करून विशेष विद्यार्थ्यांमध्ये गोडवा आणि आनंद पसरवण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन, शाळेचे मुख्याध्यापक मनीष जाधव यांच्या हस्ते श्री मनोहर महाजन सर व त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने त्यांचे समाजोपयोगी कार्य गौरवण्यात आले.
डॉ. हिमांशू महाजन यांनी यावेळी भावना व्यक्त करत सांगितले, “विशेष मुलांना हक्काचं आरोग्य मिळणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असेल, तेव्हा मी कायम सेवेसाठी तत्पर असेन.”
श्री मनोहर महाजन सर आणि सौ. रंजना महाजन ताई यांचे सामाजिक योगदान अमळनेर परिसरात कायमच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हिमांशू यांनी MBBS शिक्षण पूर्ण करून आरोग्य क्षेत्रात ठसा उमठवला आहे.
या उपक्रमाने “वाढदिवस म्हणजे फक्त सेलिब्रेशन नव्हे, तर समाजसेवेची संधी” हे उदाहरण समाजासमोर उभे केले आहे.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव सर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मनापासून परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *