1 min read

पिंप्री खु – श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य मिरवणूक…!

Loading

🔸पिंप्री खु – श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य मिरवणूक…!

🔹उद्या दि 8 डिसेंबर 2022 रोजी पालकमंत्री मा ना गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

पिंप्री खु येथे श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य मिरवणूक आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत भजनी मंडळ व वाद्य सहित गावातील महिला , तरुण – तरुणी , जेष्ठ नागरिक , सामाजीक पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता .

संताजी जगनाडे (अंदाजे इ.स. १६२४ – इ.स. १६८८) हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक होते. पुणे जिल्ह्यातील सुदुंब्रे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोत्गत पाठ होते म्हणून त्यांनी ते ते पुन्हा लिहून काढले.

पिंप्री परिसरात तेली समाज बांधव यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आपल्या प्रतीकांचा सन्मान व्हावा तसेच सामाजिक एकोपा वाढीस लागावा या हेतूने समस्त तेली समाज बांधव तसेच संताजी युवा फाउंडेशन यांच्या एकविचाराने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजन करण्यात आला आहे . तसेच समाजातील जेष्ठ नागरिक भिका काशीराम चौधरी यांनी ( काशीराज नगर पिंप्री खु ता धरणगाव ) मंदिरा साठी जागा दिल्याने सर्व समाजबांधव व नागरिक यांच्याकडून कौतुक व्यक्त होत आहे.

उद्या दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी मा. ना . गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य ) तसेच श्री गुलाबराव देवकर (माजी पालकमंत्री ) , श्री शिरीष चौधरी (माजी आमदार अमळनेर) , व विविध पक्ष , सामाजिक पदाधिकारी , कार्यकर्ते , सामाजिक बांधव यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा व मूर्तीस्थापना कार्यक्रम पार पडणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *