जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे दिल्ली MCD च्या निकालानंतर उत्साहात जल्लोष साजरा


जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे दिल्ली MCD च्या निकालानंतर उत्साहात जल्लोष साजरा
आज दि.07डिसेंबर 2022रोजी दिल्ली MCD चा निकाल जाहीर झाला. आम आदमी पार्टीला 200 जागापैकी 134 जागेवर बहुमत सिद्ध झाल्यामुळे आज दिल्ली MCD वर आम आदमी पार्टीचा झेंडा फडकला.दिल्लीचे मुख्यमंत्री.अरविंद केजरीवाल यांनी जनतेला दिलेल्या आश्वासन पूर्ण केले.त्यामुळे दिल्ली MCD निवडणूक मध्ये भरभरून यश मिळाले.या यशाचे पडसाद आज जळगाव शहरात सुद्धा उमटले. जळगाव शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्तानी मिळून उत्साहात आनंद उत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून. फटाके फोडून. पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला.याप्रसंगी जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष. योगेश हिवरकर. महानगर उपाध्यक्ष. डॉ. नारायण अटकोरे. महानगर संघटक प्रमुख. रत्नाकर खरोटे. जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष. डॉ.अनुजा पाटील. जिल्हा मीडिया प्रमुख. योगेश भोई. तसेच.डॉ. सुनील गाजरे सर माधवराव जाधव. मिलिंद भाऊ चौधरी. ओम प्रकाश अग्रवाल. प्रमोद पाटील. चंदन पाटील. दुर्गेश निंबाळकर. तुषार तायडे. आदी.कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.