आत्मिक शांतीसाठी श्रीदत्त तत्व आवश्यक… जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविन्द्र भोळे


आत्मिक शांतीसाठी श्रीदत्त तत्व आवश्यक… जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविन्द्र भोळे
नायगाव पेठदत्तनगर : भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्याच्या व्दारे दत्तगुरूची उपासना केली जाते . मनुष्य मर्यादित काळासाठी पृथ्वी तलावर असून श्री दत्ततत्व अनादी अनंत काळापासून आहे. दत्ततत्वाची भ्रमंती अमर असून मनुष्य नस्वर आहे. मनुष्याच्या जीवनातील आधी व्याधी वेदना, प्रापंचिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी श्रीदत्ततत्व साधकाला आधार वाटतो. दत्त परमेश्वराचे दुत असून आपले रक्षण करतो असा ही साधकाला धीर मिळतो. परम शांती व अखंड आनंद प्राप्तीसाठी श्री दत्तात्रेयाची उपासना केल्याने रज, तम गुण नाहीसे होऊन सत्वगुण जागे होतात. मनुष्याच्या सुख दुःखात धावून जाणे म्हणजे दत्त उपासना. आत्मिक शांती समाधान प्राप्ती साठी श्री दत्तजयंती सारखे उपक्रम राबविने, परम शांती व आनंद प्राप्तीसाठी महत्व पूर्ण आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री दत्तकृपा हौसिंग सोसायटी तर्फे श्री दत्त जयंतनिमित्त प्रवचनात वरील मत व्यक्त केले. ह्या पुढे मार्ग दर्शन करताना ह भ प डॉ रविंद्र भोळे म्हणले की पवित्रता, सात्विकता, विरक्तता,लीनता, अंगी येण्यासाठी दत्तात्रय उपासना महत्वाची आहे. ह्या प्रसंगी ह भ प तुषार चौधरी ह्यांचे कीर्तन झाले. पंचक्रोशितील अनेक मान्यवर, भाविक भक्त उपस्थीत होते.