कोकण विभाग शिक्षक आघाडीच्या कार्य अहवालाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक


कोकण विभाग शिक्षक आघाडीच्या कार्य अहवालाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक
ठाणे कल्याण( मनिलाल शिंपी): :आज शिक्षक आघाडी भाजपाचा कार्य अहवाल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीने आज पर्यंत केलेल्या विविध उल्लेखनीय कार्यांचा हा अहवाल आहे.तसेच कोरोना काळात केलेल्या कार्याची विशेष प्रशंसा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शिक्षकांच्या विविध समस्या विषयी वेळोवेळी घेतलेल्या महत्वपूर्ण भूमिका आंदोलन यांची माहिती विकास पाटील यांनी बावनकुळे यांना दिली. भाजप शिक्षक आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच कोकण विभागात करत असलेल्या विद्यार्थी, शिक्षक ,संस्था यांच्या साठी करत असलेल्या विविध बाबींची माहिती आहे . कोकण विभाग शिक्षक मतदार नोंदणी सुसंपर्क अभियान या सर्व बाबींची दखल प्रदेशाध्यक्षांनी घेऊन शिक्षक आघाडीच्या कार्याची प्रशंसा केली.
या वेळी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे प्रकाशित “अनाजधुन” हा अंक श्री बावनकुळे यांना देऊन संघटना करीत असलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली असे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.