1 min read

मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

Loading

मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

अमळनेरला
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रशिक्षण…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान केंद्राची रचना व्यवस्थित करावी ,शासनाच्या आदेशानुसार नियमांचे तंतोतंत पालन करावे,केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी यांच्यात समन्वय असावा.शांतता सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी मतदान केंद्रावर गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी.मतदान केंद्रावर सहकार्य करण्यासाठी आम्ही तशा सूचना पोलीस पाटील यांना देणार आहोत..
मतदान प्रक्रिया शांतता सुरळीत पार पाडावी असे अमळनेर येथील तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षण केंद्रात मार्गदर्शन करतांना सांगितले.
विचारपिठावर नायब तहसीलदार अमोल पाटील नवनाथ लांडगे उपस्थित होते.
तहसीलदार पुढे म्हणाले कि निवडणुकीत गोपनियेतेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रशिक्षणार्थींना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न व उत्तर माध्यमातून तहसीलदार यांनी निवडणुकीतील विविध प्रश्न व उत्तर च्या माध्यमातून शंका समाधान केले. शिक्षक प्रशिक्षणार्थींनी निवडणुकीतील प्रक्रिया कशी राबवावी या संदर्भामध्ये शिक्षक सुभाष पाटील, अमोल पाटील, हरी माळी यांनी चर्चात्मक प्रश्नांची उत्तरे दिली.तालुक्यातील 24 ग्रामपंचायत निवडणूकीचे व एकूण मतदान केंद्र-75 असलेल्या निवडणूकीचे
18 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीचे पहीले प्रशिक्षण इंदिरा भवन कार्यालयात येथे संपन्न झाले.
सी आर सी- माकपोल याबाबत सविस्तर माहिती तलाठी वाल्मीक पाटील, स्वप्निल कुलकर्णी यांनी दिली.
दुपारच्या सत्रात तलाटी पिंटू चव्हाण, पी.एस सोनवणे, गौरव शिरसाट ,महेश अहिरराव ,वाय आर पाटील, जे ए.जोगी यांनी कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट या संदर्भामध्ये सविस्तर माहिती येऊन प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणार्थी बंधू उपस्थित होते.मतदान प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *