कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, सध्याचा वातावरणात मुलींना स्वयंभू व बिनधास्त जगण्यासाठी ज्युडो प्रशिक्षण आवश्यक -श्रीमती लिना मॅथ्यू ..
कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. सध्याचा वातावरणात मुलींना स्वयंभू व बिनधास्त जगण्यासाठी ज्युडो प्रशिक्षण आवश्यक -श्रीमती लिना मॅथ्यू ..



ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी ):: कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत जिल्हास्तरीय आंतर शालेय ज्युडो स्पर्धांचे नोडल अधिकारी स्नेहा कर्पे यांचा मार्गदर्शनाखाली व क्रीडा पर्यवेक्षक राजेश भगत यांचा नेतृत्वाखाली, अग्रवाल महाविद्यालयाचे क्रीडा संचालक विजय सिंग यांचा हस्ते उद्घाटन करणात आले.यावेळी ज्युडो असोसिशएन चे अधक्ष के. ए.मॅथ्यू .सचिव लिना मॅथ्यू . अडव्होकेट दयानंद गायकवाड, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांच्या प्रमुख उपस्थितीत,उद्योजक निलेश केणे यांनी प्रत्यक्ष पंच म्हणून ज्युडो स्पर्धांना सिग्नल देऊन सुरवात केली.जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत १४/,१७/१९ वर्ष वयोगटातील १००/१५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना ज्युडोपटू लिना मॅथ्यू . यांनी सांगितले की,आजचा धकाधकीचा आणि स्रीयांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुलींनी ज्युडो प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.क्रीडा पर्यवेक्षक राजेश भगत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.आणि आभार मानत खेळाडूंना उत्कृष्ट यशासाठी शुभेच्छा दिल्या.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नेरुळकर विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक अनंत उतेकर, क्रीडा समिती सदस्य कृष्णा माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.राष्ट्रीय पंच आणि NIS कोच पूर्वा मॅथ्यु,आशुतोष लोकरे यांचा संपूर्ण टीम ने स्पर्धांचे निकाल आणि योग्य खेळाडूची निवड करण्यात मोलाची कामगिरी बजावली.