निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव-मयूर पाटील
शाखा प्रबंधक
युनियन बँक शहादा
निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव
मयूर पाटील
शाखा प्रबंधक
युनियन बँक शहादा
हिंदी अध्यापक मंडळाचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न




अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-विविध
स्पर्धेमधून हिंदी भाषेविषयी आदर वाढवण्याची एक संधी मिळते. व लेखन स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळतो यासाठी अमळनेर हिंदी अध्यापक मंडळ दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेचे महत्त्व प्रतिपादन करून गोडी निर्माण करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्यासाठी माझा सदैव सहकार्य राहील असे मयूर पाटील (युनियन बँक शाखा प्रबंधक शहादा) मार्गदर्शन करतांना पूज्य साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या सभागृहात निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.
व्यासपीठावर शहादा युनियन बँकेचे प्रबंधक मयुर पाटील,माजी गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण,साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे , खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सो वसुंधरा लांडगे,श्रीमती भारती भांडारकर,सौ.निरंजना वानखेडे,श्री.राजेंद्र निकम सर,प्रा.डॉ.कल्पना पाटील (ग्रामीण)परीक्षक),
प्रा.सोपान भवरे (शहरी परीक्षक) होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील म्हणाले की शिक्षणात स्पर्धापरीक्षा आणि
साहित्यात योगदान इतर सर्व
बाबतीत हिंदी विषयी अनुकुलता निर्माण करणे तसेच संगीत कला
साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात हिंदीचे योगदान काय यावरही प्रकाश टाकला जातो. व शाळा
कॉलेज संस्था कार्यालये
आकाशवाणी प्रसारमाध्यमे
यांसोबत प्रत्येक संपर्काच्या
ठिकाणी हिंदी वापरण्यास कसा वाव मिळेल हे जाणले जाते.आपणही हिंदी विषयी आदर व्यक्त करणे, आपल्या
मातृभाषेसोबतच हिंदीचाही एक संपर्काच्या दृष्टीने उपयोग करावा.राष्ट्रनिर्माणात हिंदीचे योगदान महत्त्वाचे आहे व हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे असे अमळनेर गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अमळनेर येथे सानेगुरुजी शिक्षक पतपेढीत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील म्हणाले कि
शिक्षणात स्पर्धापरीक्षा आणि
साहित्यात योगदान इतर सर्व
बाबतीत हिंदी विषयी अनुकुलता निर्माण करणे तसेच संगीत कला
साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात हिंदीचे योगदान काय यावरही प्रकाश टाकला जातो. व शाळा
कॉलेज संस्था कार्यालये
आकाशवाणी प्रसारमाध्यमे
यांसोबत प्रत्येक संपर्काच्या
ठिकाणी हिंदी वापरण्यास कसा वाव मिळेल हे जाणले जाते.आपणही हिंदी विषयी आदर व्यक्त करणे, आपल्या
मातृभाषेसोबतच हिंदीचाही एक संपर्काच्या दृष्टीने उपयोग करावा.राष्ट्रनिर्माणात हिंदीचे योगदान महत्त्वाचे आहे त्यासाठी हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी गोडी निर्माण केली जाते. शिक्षकांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते खरोखरच अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे असे सांगत सर्व बक्षीस पात्र विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले..
तर खान्देश शिक्षण मंडळाचे विश्वस्त वसुंधरा लांडगे म्हणाल्या की देशाच्या विकासात राष्ट्रभाषेचा सन्मान महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयी जनजागृती करून हिंदी अध्यापक मंडळांनी केलेले कार्य अभिनंदनीय आहे असे सांगितले…
माजी गटशिक्षणाधिकारी सौ शर्मिला चव्हाण म्हणाल्या कि
सेवानिवृत्तीनंतरही मला हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्यक्रमाला हिंदी अध्यापक मंडळांनी सन्मान दिला व हिंदी भाषा ही संपर्क भाषा असून तिच्या सन्मान आदर करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे असे सांगत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व पुरस्कार्थी बांधव व भगिनींचे अभिनंदन माजी गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण यांनी केले…
साने गुरुजी शिक्षण मंडळाचे सचिव संदीप घोरपडे म्हणाले की सध्या कृती शिक्षणाची गरज आहे असे सांगत शिक्षणात स्पर्धापरीक्षा आणि
साहित्यात योगदान इतर सर्व
बाबतीत हिंदी विषयी अनुकुलता निर्माण करणे तसेच संगीत कला
साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात हिंदीचे योगदान काय यावरही प्रकाश टाकला जातो. पण शाळा
कॉलेज संस्था कार्यालये
आकाशवाणी प्रसारमाध्यमे
यांसोबत प्रत्येक संपर्काच्या
ठिकाणी हिंदी वापरण्यास कसा वाव मिळेल यासाठी प्रयत्न करत आपणही हिंदी विषयी आदर व्यक्त करणे, त्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी प्रेम निर्माण करणे व वर्षभर कार्यक्रम घेणे यासाठी शिक्षक अद्यापकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार्थी
श्रीमतीभारतीभांडारकर,सौ.निरंजना वानखेडे,श्री.राजेंद्र निकम यांनी मनोगत व्यक्त करत हिंदी अध्यापक मंडळाचे सदैव ऋणत राहण्याचा आश्वासन दिले…
बक्षीस वितरण समारंभाचे
प्रस्ताविक हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन दिपक पवार,डॉ.किरण निकम,कविता मनोरे यांनी केले. तरआभार -दिलीप पाटील यांनी केले.
यावेळी अमळनेर तालुक्यातील हिंदी शिक्षक व सर्व उत्तीर्ण व बक्षीस पात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला यशस्वीतेसाठी मार्गदर्शक दिपक पवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे,नारायण चौधरी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर,सचिव दिलीप पाटील, सहसचिव कमलाकर
संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, प्रतियोगिता समिती सदस्य मुनाफ तडवी, प्रदीप चौधरी, ज्येष्ठ सदस्य डॉ. किरण निकम, श्रीमती कविता मनोरे श्रीमती योगेश्री पाटील, प्रशांत वंजारी, जितेंद्र बाविस्कर या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व हिंदी अध्यापक मंडळाचे सदस्य यांनी प्रयत्न केले. निबंध स्पर्धेतील सर्व विजेता विद्यार्थ्यांचे अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.