1 min read

लक्ष्मणराव पाटील यांची नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड!…

Loading

लक्ष्मणराव पाटील यांची नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड!…

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील

धरणगांव – धरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांची नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली. सदर निवड ही नाशिक विभाग विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आयुक्त राधाकृष्ण गमे, उपायुक्त (महसुल) उन्मेश महाजन यांनी केली.
नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यपदी नाशिक, धुळे जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या पाच जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्तीची निवड करण्यात आली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातून सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांची त्यांच सामाजिक – शैक्षणिक कार्य पाहून निवड करण्यात आली.
आज रोजी सदर निवडीचे पत्र धरणगाव तहसिल कार्यालयाचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या हस्ते लक्ष्मणराव पाटील यांना पत्र देण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. आजच्या या निवडीबद्दल लक्ष्मणराव पाटील यांनी प्रांताधिकारी विनयजी गोसावी आणि तहसिलदार नितीनकुमार देवरे यांचे आभार व्यक्त केले. माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल, असे पाटील म्हणाले. त्यांच्या या निवडीचे सर्व मित्र परिवाराकडून व सामाजिक स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *