जि.प.प्राथमिक शाळा मुसई खु. येथे रंगभरण व सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न
जि.प.प्राथमिक शाळा मुसई खु. येथे रंगभरण व सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा उत्साहात संपन्न
सत्यशोधक समाज संघाचा प्रेरणादायी उपक्रम !……

धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर
धरणगाव – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथे सत्यशोधक समाज संघ आयोजित रंगभरण व सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रवींद्र पाटील होते.११ डिसेंबर २०२२ रोजी रविवार सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ येथे होणार आहे.सत्यशोधक समाज संघ जिल्हा संघर्ष समितीचे प्रमुख पी.डी.पाटील सर,भारतरत्न डॉक्टर एपिजे अब्दुल कलाम पुस्तक भिश्शीचे संस्थापक अध्यक्ष विजय लुल्हे, आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, एच.डी. माळी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य घराघरापर्यंत पोहचवावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रंगभरण स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या २० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.
रंगभरण स्पर्धेत प्रथम-विद्या मंसाराम सोनवणे,द्वितीय देवेश गोपाल पाटील व तृतीय क्रमांक जयेश विनोद महाजन यांना देण्यात आला. तर सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक यशस्विनी पाटील,द्वितीय क्रमांक सविता बामणीया व तृतीय क्रमांक विद्या मंसाराम सोनवणे यांना देण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सौ.रजनी कराये, समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील तसेच सदस्य यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ रजनी कराये,संजय गायकवाड व वैशाली वाणी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपशिक्षक संजय गायकवाड यांनी केले.