1 min read

द्रौ.रा.कन्या शाळेत गीता जयंती साजरी

Loading

द्रौ.रा.कन्या शाळेत गीता जयंती साजरी

अमळनेर-येथील गीता जयंती निमित्त “गीता ज्ञान मंडळाच्या वतीने द्रौ.रा.कन्या शाळा अमळनेर येथे दि.३ डिसेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ अखेर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना गीतेच्या १२ व्या अध्यायाचे पठण शिकवले.सुरुवातीला श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करण्यात आले.हा उपक्रम प्रा.रमेश बहुगुणे सर व प्रा.सतिष सोनार सर यांच्या मार्गदर्शनाने खा.शि.मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे यांनी राबवला.या उपक्रमास द्रौ.रा.कन्या शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल यांची उपस्थिती लाभली.अध्यापनासाठी गीता परिवाराच्या सदस्या मीना शर्मा, ऊर्मिला अग्रवाल,सुकिर्ती देवधर, ज्योती जोशी,ममता अग्रवाल यांनी अनमोल सहकार्य केले.विद्यार्थिनींना शेवटच्या दिवशी प्रसाद वाटप व १२ व्या अध्यायाच्या पीडीएफ चे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचा २६१ विद्यार्थिनींनी लाभ घेतला.
या उपक्रमासाठी ‌गीता ज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा.बहुगुणे सर व सचिव प्रा.सतिष सोनार सर

मुख्याध्यापिका सीमा सुर्यवंशी मॅडम,पर्यवेक्षक वानखेडे सर, बाविस्कर मॅडम, जोशी मॅडम, चौधरी भाऊ व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *