1 min read

धनदाई महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा संपन्न

Loading

धनदाई महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

अमळनेर: येथील धनदाई महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभाग व धनदाई महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, विद्यापीठस्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी.डी. पाटील, महाविद्यालयाचे चेअरमन के. डी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पवार , विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भगवान भालेराव, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ लीलाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आयोजित या कथाकथन स्पर्धेत विविध महाविद्यालयातील पंधरा स्पर्धकांनी सहभाग घेतला व स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणादायक कथा सादर केल्या. या स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाच्या निर्भय धनंजय सोनार या विद्यार्थ्यास प्रथम पारितोषिक रुपये 3075, द्वितीय पारितोषिक जयेश सोनार यास रुपये 2075, तृतीय पारितोषिक जयहिंद महाविद्यालय, धुळेची विद्यार्थिनी पल्लवी शिंदे हिंस 1575 तर चतुर्थ पारितोषिक धनदाई महाविद्यालयाचे विद्यार्थिनी पद्मश्री पवार रुपये 1000 यांना प्राप्त झाले सदर कथाकथन स्पर्धेचे परीक्षण साने गुरुजी कथामालेचे समन्वयक गोपाल नेवे, गौतम मोरे व रणजीत शिंदे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.प्रवीण पवार, प्रा प्रशांत पाटील, प्रा. रमेश पावरा, प्रा. महादेव तोंडे, डॉ संगीता चंद्राकर, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. प्रतिभा पाटील आदींनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *