देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !….
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !….
सत्यशोधक समाज संघाचा अनोखा उपक्रम!….
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सत्यशोधक समाज संघ आयोजित रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर येथे
घेण्यात आल्या. स्पर्धा परीक्षा प्रमुख ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविक यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन
होते. येत्या ११ डिसेंबर २०२२ रविवार रोजी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा अधिवेशन कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ येथे होणार आहे. सत्यशोधक समाज संघ संस्थापक राज्य अध्यक्ष अरविंद खैरनार, संस्थापक सचिव डॉ सुरेश झाल्टे, सुधाकर बडगुजर, मुकुंद सपकाळे, विश्वासराव पाटील, चंद्रकांत जगदाळे अमळनेर व भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक अध्यक्ष विजय लुल्हे यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य घराघरापर्यंत पोहचायला हवे म्हणून सत्यशोधक समाज संघाकडून या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांपर्यंत ज्योतिरावांचे कार्य पोहोचवावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
शाळेतील मुलांनी उत्साहाने रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग भाग घेतला. परीक्षक म्हणून मुख्याध्यापक अनिल महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले.
रंगभरण स्पर्धेत
प्रथम -आकांक्षा दिलीप जाधव (इयत्ता 9 वी)




द्वितीय- संकेश मानसिंग तडवी (8वी)
तृतीय-नितेश करमसिंग वसावे(इ.8वी)
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत
प्रथम- ओम मगन भिल इयत्ता 8 वी
द्वितीय- श्वेता गौतम बैसाणे इयत्ता 9 वी
तृतीय -भाग्यश्री महेंद्र पाटील
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना
एका कार्यक्रमात शाळेत बक्षीस वितरण केले जाणार आहे. स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक एस के महाजन ,एच.ओ माळी,अरविंद सोनटक्के,एस.के.महाजन यांनी सहकार्य केले.