महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड

महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड
:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठी विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष उच्च विभुषित आयपीएस माजी अधिकारी तथा माजी खासदार डॉ.उदित राज असून, देशभरातील असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम काँग्रेस अंतर्गत या विभागामार्फत केले जाते.
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुणे येथील कामगार नेते सुनील शिंदे यांची आज नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र डॉ. उदित राज यांनी पाठवले आहे. सुनील शिंदे हे गेली 30 वर्षे कामगार क्षेत्रामध्ये काम करीत असून असंघटित व संघटित क्षेत्रातील अनेक कामगारांच्या समस्या यशस्वीरित्या सोडविण्याचे काम त्यांनी अहोरात्र केले आहे. विशेषतः घरेलू कामगारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. बांधकाम मजूर, ऑटो रिक्षा, कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक यांना न्याय मिळण्यासाठी अनेक आंदोलने ही त्यांनी केले आहेत व त्यात त्यांनाही यश आले आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य शासननियुक्त अशासकीय संचालक पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी मंडळाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.तसेच स्थानिय कामगार राज्य महामंडळ कमिटी पुणे संचालक, माजी संचालक महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंंडळ महाराष्ट्र शासन त्याचबरोबर राष्ट्रीय मजदूर संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष म्हणूनही उत्तमरित्य व ऊत्कृष्टरित्या काम व कार्ये केलेले आहेत. श्री.सुनिल शिंदे हे गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्रातील गाव-वाडी-तांडा-वस्तीसह, प्रभाग, वार्ड, मोहाल्ला, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, मेट्रो शहर, शहर, तालुका व जिल्हा पातळीवर सर्वसामान्य माणसांच्या, कामगारांच्या, असंघटित व संघटित कामगार, घरेलू महिला, अॕटो रिक्षा, बांधकाम मजूर, ऑटो रिक्षा, कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक पर्यंत माणसांच्या सुख-दु:खात सहभागी होण्यासाठी कायम तत्पर असणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रातील गाव-वाडी-तांडा-वस्तीसह शहरात नवलौकिक ख्याती आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा, त्यांची कुठल्याही पध्दतीचे शोषण होऊ नेय, शासन दरबारी काम अडकुन पडु नेयत म्हणून त्यांची दिवसरात्र धडपड करणारे व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष होणे हे अत्यंत यथार्थ व सर्वसामान्य माणसाला व पक्ष संघटनेला अधिक बळकटी देणारे आहे.श्री.शिंदे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय नेत्या सोनीया गांधी, राष्ट्रीय युवानेते खा.राहुल गांधी, युवानेत्या प्रियंका गांधी, अखिल भारतीय संघठित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे व परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उदीत राज, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशअध्यक्ष नानाभाऊ पटोले, आ.भाई जगताप यांच्यासह अनेक रथी महारथी, थोरमोठयांच्या सततच्या संपर्कात राहुन मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष संघटना बांधणी उत्तमपणे केलेले आहेत. त्यामुळेच त्यांना उपरोक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे.