1 min read

राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ नागपूर येथे विधान भवनावर करणार धरणे आंदोलन.

Loading

राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ नागपूर येथे विधान भवनावर करणार धरणे आंदोलन.

जळगाव: आज दि.१० डिसेंबर रोजी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे आदेशान्वये जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीची सहविचारसभा अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी सर्वप्रथम संघटनेच्या नजीकच्या काळात मृत्य झालेल्या आजी -माजी सदस्यांना श्रद्धांजलीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तदनंतर संघटनेचे जिल्हा सचिव प्रा.श्री.सुनील सोनार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम केले.
सदर सभेत पुढील ठराव संमत करण्यात आले.
१)जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतूनच व्हावे.
२) १नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या व नंतरच्या सर्वच शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी.
३)२०१३पासून कार्यरत वाढीव अर्थात पायाभूत पदांना नियुक्ती दिनांकापासून तात्काळ मान्यता देऊन वेतन अदा करावे व सेवा संरक्षण प्रदान करावे.
४) विनाअनुदानितवरून अनुदानितवर बदलीच्या जाचक शासन आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी.
५) आश्र्वासित प्रगती योजना विनाविलंब लागू करावी.
६)बक्षी समिती खंड २च्या शिफारशींची त्वरीत अंमलबजावणी करावी.

हे सर्व ठराव एकमताने संमत होऊन नागपूर येथे होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. तत्पूर्वी दि.१६ डिसेंबर रोजी सर्व प्रलंबित मागण्यांचे निवेदन मा. शिक्षणाधिकारीसो.(माध्य. जि.प.जळगाव) यांना देण्याचे निर्धारित करण्यात आहे. वरील दोन्ही प्रसंगी जास्तीत जास्त प्राध्यापक बंधू-भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त जिल्हा कार्यकारिणीने केलेले आहे. सदर सभेस जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.नंदन वळींकार, जिल्हा सचिव प्रा.श्री.सुनील सोनार, कार्याध्यक्षद्वय प्रा.श्री. शैलेश राणे, प्रा.श्री.सुनील पाटील, जेष्ठ मार्गदर्शकद्वय प्रा.श्री. सुनील गरुड, प्रा.श्री. डी.डी. पाटील उपाध्यक्ष सर्वश्री.प्रा. गजानन वंजारी, प्रा.अतुल इंगळे, प्रा.संजय पाटील, सहसचिव प्रा.ज्ञानेश्वर चिकटे, जळगाव ग्रामीण अध्यक्ष प्रा.सुधाकर ठाकूर, जळगाव महानगराध्यक्ष प्रा.श्री.राहुल वराडे, क्रीडा प्रतिनिधी प्रा.श्री.मनोज वारके व जिल्हा कार्यकारिणीचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभेचे सूत्रसंचालन प्रा.श्री. सुनील सोनार तर आभार प्रदर्शन प्रा.श्री.सुनील गरुड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *