शिवरथ प्रतिष्ठानने दिली हिवाळ्यात
गरीब वंचितांना ऊब!!

शिवरथ प्रतिष्ठानने दिली हिवाळ्यात
गरीब वंचितांना ऊब!!
अमळनेर प्रतिनिधी
शिवरथ प्रतिष्ठान एक सामाजिक दातृत्व जोपासणार समाजपीठ आहे. दिवाळीत गरजू लोकांना कपडे व फराळ वाटप करून “एक घास गरिबांसाठीही ” या उक्तीप्रमाणे त्यांनी गरीब वस्तीत हा उपक्रम राबविला.. आपल्या आई व वडिलांच्या स्मृतिपित्यर्थ हे सामाजिक कामाचं व्रत त्यांनी घेतले.बापूराव ठाकरे हे समता प्राथमिक परिषदेचे अमळनेर तालुका प्रमुख आहेत. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ह्या संघटनेतही आपले योगदान देणारे हे व्यक्तिमत्व आहे..
. हिवाळ्याच्या थंडीची चाहूल लागताच गरीब गरजू लोकांना ऊब मिळावी म्हणून त्यांनी जळगावहून ब्लॅंकेट आणून गरीबवस्तीतील गरजुना मी एक समाजाचे देणं लागतो या विचारातून हे दातृत्वाचे काम केले…
आज सांयकाळी कै.आनंदराव तुळशीराम ठाकरे आणि कै.अंजनाबाई आनंदराव ठाकरे. रा.मंगरूळ ता.चोपडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवरथ प्रतिष्ठान
,८५/ब प्रतापमिल,कंपाऊंड .अमळनेरया संस्थे मार्फत गरीब व गरजूंना थंडी पासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले. शिवरथ प्रतिष्ठान चे शिवश्री बापूराव ठाकरेसर, सौ.पूनम ठाकरे, आणि मित्र परिवार शिवश्री. कैलास पाटील सर.शिवश्री. अनंतकुमार सूर्यवंशी सर.शिवश्री. नरेंद्र अहिरराव सर.कु. विधी ठाकरे चि.नितेश ठाकरे उपस्थित होते.