पोलीस पाटलांच्या मागण्याबाबत आमदार जयकुमार रावल यांना निवेदन

पोलीस पाटलांच्या मागण्याबाबत आमदार जयकुमार रावल यांना निवेदन
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे यांचे नेतृत्वाखाली येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे पोलीस पाटलांच्या विविध मान्य प्रलंबित असून येणाऱ्या अधिवेशनात त्या मागण्या सोडवण्यासाठी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले या संदर्भात महाराष्ट्रातील प्रत्येक स्थानिक आमदारांना पोलीस पाटील संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यात दिनांक 13 डिसेंबर रोजी शिंदखेडा मतदारसंघाचे माजी कॅबिनेट मंत्री व आमदार जयकुमार रावल यांना पोलीस पाटील संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले व येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे मोर्चा धडकणार आहे पोलीस पाटलांच्या मागण्या त्वरित सोडवण्यात याव्या, यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील ज्येष्ठ,पोलीस पाटील, बिला, मालचे,बापू बागुल चरणसिंग,गिराशे नरेंद्र गिरासे योगेश गिरासे हिरालाल कोळी भडने येथील पोलीस पाटील युवराज माळी नरेंद्र गिरासे भाऊ परदेशी आधी यावेळी उपस्थित होते