भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे यांची चेतक महोत्सवाला सदिच्छा भेट!


भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे यांची चेतक महोत्सवाला सदिच्छा भेट!
सारंगखेडा (मनिलाल शिंपी) ::
नंदुरबार जिल्ह्यातील, शहादा तालुक्यामधील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाला भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे, मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख आर एस पी कमांडर डॉ. मणिलाल रतिलाल शिंपी, स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट तथा दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, भिवंडी पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, यांनी नुकताच सदिच्छा भेट दिली. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनीही फोनवरून सविस्तर माहिती दिली. स्वागत केले.यावेळी त्यांच्यासोबत सारंगखेडा येथील निस्वार्थ समाजसेवक महेश भाई बंशी पाटील,व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी वर्गाने संपूर्ण चेतक महोत्सव बाजारातील विविध घोड्यांची माहिती भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे यांना दिली लाखो घोडे या बाजारात विक्रीसाठी आणले जातात, आज पर्यंत ९६,७०,५०० घोड्यांची विक्री झाली असल्याची माहिती यावेळी कर्मचारी वर्गाने दिली.तसेच बारा लाखाच्या घोड्यासोबत काही क्षणचित्रे काढून घेतली, आत्ता खरी या महोत्सवाला सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील सारंग खेडा येथील चेतक महोत्सव हा सर्वात मोठा महोत्सव म्हणून महाराष्ट्रात आनंदाने साजरा केला जात आहे. त्यामुळे या
चेतक महोत्सवाला संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीने व भिवंडी तालुक्याच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व सोबत असलेल्या सर्व मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.