1 min read

मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्ही स्कूल ॲप अभ्यासात मिळविले घवघवीत यश …….

Loading

मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्ही स्कूल ॲप अभ्यासात मिळविले घवघवीत यश या चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी व्ही स स्कूल ॲप वर अधिकाधिक अभ्यास करावा यासाठी जिल्हा परिषद जळगाव ने दरमहा प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचे सुचित केले होते. या उपक्रमात मारवडच्या शाळेने सहभाग घेऊन ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या तीनही महिन्यांमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक अभ्यास केल्याबद्दल बक्षिसांची हॅट्रिक मिळविली. यात सर्वप्रथम कु. माहेश्वरी रवींद्र साळुंखे इ.3 री द्वितीय क्रमांक प्रज्ञा दिग्विजय साळुंखे इ.2 री तृतीय क्रमांक दिव्यांनी समाधान शिंदे इ .1 ली व मानसी शशिकांत शिंदे इ.1ली यांनी बक्षीस मिळविले मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्री पंकज जी आसिया साहेब, प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री विकास पाटील साहेब जिल्हा परिषद जळगाव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बक्षीस मिळाले होते. त्यांना आज मा. गटशिक्षणाधिकारी श्री विश्वास पाटील साहेब , ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री पी. डी. धनगर साहेब, मारवड केंद्राचे केंद्र श्री अशोक सोनवणे, केंद्रप्रमुख श्री शरद सोनवणे यांच्या हस्ते पंचायत समिती अंमळनेर येथील पूज्य साने गुरुजी सभागृह आयोजित मुख्याध्यापक सभेत विद्यार्थ्यांना पालकांसमवेत बक्षीसांचे वाटप करण्यात आले.शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती मनीषा सुरेश निकम ,श्री दिनेश रमेश मोरे व श्रीमती शारदा संतोष जाधव उपशिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *