प्रतिभा शिंदे व मुकुंद सपकाळे यांना पोलीस दडपशाहीने अटक करून लोकशाहीचा मार्ग अडविला ❗


प्रतिभा शिंदे व मुकुंद सपकाळे यांना पोलीस दडपशाहीने अटक करून लोकशाहीचा मार्ग अडविला ❗
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या थोर पुरुषांचा अवमान करणारे नियोजनपूर्वक बेताल वक्तव्य या सरकार कडून केले जात असून औरंगजेबला पत्र लिहून शिवाजी महाराजांनी पाच वेळा माफी मागितली असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदी (भाजप प्रवक्ते) तसेच कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांकडे भीक मागून शाळा सुरू केल्या असे वक्तव्य (उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच समर्थ के बिना कौन शिवाजी को पुछेगा असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असे मोठ्या पदावर असणारे व्यक्ती यांनी नियोजनपूर्वक बेताल वक्तव्य करून अवमान केला याचा जाब महाराष्ट्रातील जनता मागेलच. या घटनेचा निषेध करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाचा अध्यक्षा प्रतिभा शिंदे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे मुकुंद सपकाळे यांनी लोकशाही व संवैधानिक मार्गाने १३ डिसेंबर २०२२ रोजी ठीक सकाळी ०९:३० वाजता बांभोरी जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचे नियोजन केले होते परंतु हे आंदोलन सुरू करण्याचे अगोदरच ते राज्य सरकारने पोलीस प्रशासनावर दबाव आणून हे आंदोलन दडपण्याचे काम या ठिकाणी केले आहे. व हा केलेला प्रकार बघून सूचक होते की लोकशाहीच्या विरोधात हे कृत्य आहे आणि संविधानिक बाबी ज्या मार्गाने आंदोलन केले जातात ते याठिकाणी दडपशाहीचा अवलंब करीत हुकुमशाहीची सत्ता प्रस्थापित असल्यामुळे अशा पध्दतीचे प्रकार राज्यात व देशात घडत आहे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत.
राज्य शासनाचा निषेध असो…..❗
राज्य शासनाचा निषेध असो…..❗
राज्य शासनाचा निषेध असो…..❗
नहीं चलेगी, नहीं चलेगी, दडपशाही नहीं चलेगी…..❗
नहीं चलेगी, नहीं चलेगी, हुकूमशाही नहीं चलेगी…..❗