जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धामध्ये १७ वर्षीय वयोगटात नंदिनी पाटील ही ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिल्ह्यात प्रथम
अमळनेर दि.१३
जळगांव येथे दि.१३डिसेंबर ला आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धामध्ये १७ वर्षीय वयोगटात नंदिनी मुकेश पाटील ही ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिल्ह्यात प्रथम आली.
नंदिनी मुकेश पाटील ही लोंढवे येथील स्व. आबासो. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी आहे. तिला क्रीडाशिक्षक मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नासिक येथे विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये नंदिनी ही जळगांव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. तिच्या या यशा बद्दल जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित,अँथेलेटीक्स असोसिएशनचे जिल्हा सचिव राजेश जाधव, मिनल थोरात ,संस्थेचे चेअरमन डॉ. बि. एस.पाटील मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी कौंतुक करून अभिनंदन केले आहे.
