शालार्थ आयडी देतांना मूळ नस्ती मागणी करुन कर्मचाऱ्यांचा छळ थांबवा”
“शालार्थ आयडी देतांना मूळ नस्ती मागणी करुन कर्मचाऱ्यांचा छळ थांबवा”
आपणास निवेदन देण्यात येते की शासनाने कधीही कुठेही शालार्थ आयडी बाबतीत मुळनस्ती मागणी बाबतीत निर्णय घेतलेला दिसुन येत नाही.परंतू आपल्याच शिक्षण विभागांचे अधिकारी म्हणून सर्व प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावरिल अधिकारी हे प्रस्ताव छानणी करून मगच मान्यता आदेश देतात हे सर्व ज्ञात आहेच.मग आपल्या कार्यालयात यापूर्वी अनेक शिक्षण उपसंचालक महोदय आलेत व गेलेत परंतु त्यांनी असे कुठलेही मुळनस्ती मागणीचे प्रकार केले नाहीत.जर आपणच आपल्या विभागातील शिक्षणाधिकारी सारख्या पदावरील अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवून मुळनस्ती मागणी करुन विनाकारण कर्मचाऱ्यांचा आपणाकडे शालार्थ आयडी चे दाखल प्रस्तावाच्या बाबतीत मुळनस्ती मागणी करुन कर्मचाऱ्यांचा विनाकारण वेळ घालविणे व मनस्ताप देण्याचा हा प्रकार आहे.
जर मान्यता देणारे कोणतेही शिक्षणाधिकारी हे गैर व चुकीच्या पद्धतीने मान्यता देत असतील तर त्यांचेवर तात्काळ फसवणूकीचे व इतर कलमाखाली गुन्हे दाखल करा.
परंतु शालार्थ आयडी चे कर्मचाऱ्यांना मुळनस्ती च्या नावाखाली देण्यात येणारा त्रास व छळ थांबवा अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक शिक्षकेतर परिषदचे अध्यक्ष प्रविण (बापू) महाजन यांनी शिक्षण उपसंचालक नाशिक व शिक्षण मंत्री मा.दिपक केसरकर व शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे केली आहे
