मराठी पाऊल पडते पुढे!

मराठी पाऊल पडते पुढे!
भाषा ही मानवाला दिलेली देणगी आहे. भाषेद्वारा मनुष्य अभिव्यक्त होत असतो. माणसाच्या अभिव्यक्तीचा विकास शालेय वयातच विकसित होत असतो. विद्यार्थ्यांच्या या अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील निवासी शाळेत भाषा अभिव्यक्तिसाठी विविध स्पर्धांचे आयोजन इंग्रजी विभाग प्रमुख श्रीमती दिपिका जैन मँडमनी केले होते. या स्पर्धेचा एक भाग म्हणून इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी काव्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रसग्रहण व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी विषयाचे शिक्षक मिनल परेरा व संजीवनी नारकर मँडमनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन यांनी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेबरोबरच महाराष्ट्राची अस्मिता व मराठी भाषेचा अभिमान बाळगण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.