शारदा माध्यमिक विद्यालयात शाळास्तरीय विज्ञानप्रदर्शन संपन्न!!!

शारदा माध्यमिक विद्यालयात शाळास्तरीय विज्ञानप्रदर्शन संपन्न!!!
अमळनेर तालुक्यात कळमसरे शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध आहे.. कोणतेही काम ह्या शाळेत चांगल्या पद्धतीने पार पाडले जाते..तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन होण्यापूर्वी दरवर्षी शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेतले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्गातील मुलांनासहभाग घेता यावा यासाठी ह्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते… मागील आठवड्यापासून अथक परिश्रमाने मुले तयारी करीत होते..गटशिक्षणाधिकारी यांच्या भेटीचे निश्चित झाल्यावर दिनांक 15/12/2022 ला विज्ञान प्रदर्शन घेण्याचे निश्चित झाले व घेण्यात आले..
या प्रदर्शनाता 50 मॉडेल तयार करण्यात आले होते.. त्यात टाकाऊपासून टिकाऊ मॉडेल सुद्धा होते.. विज्ञान प्रदर्शनात शासनाच्या परिपत्रकात दिलेल्या विषयानुसार मुलांनी प्रयोग केलेले होते.. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन मा. शिक्षणाधिकारी श्री व्ही. एच. पाटील साहेब यांनी केले.. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेंदलाल कोठारी होते..
विज्ञान प्रदर्शनासाठी मा.पी. डी धनगर साहेब, केंद्रप्रमुख मा.अशोक सोनवणे, केंद्रप्रमुख व तज्ज्ञ मार्गदर्शक सोनवणे उपस्थित होते.. विज्ञान प्रदर्शनासाठी आलेल्या अधिकारी यांचा सत्कार अध्यक्ष,संचालक मंडळातील सुनिलभाऊ छाजेड, दिपचंद छाजेड, योगेंदसिंग पाटील, आर. जी. चौधरी यांनी केले.. शाळेचे पर्यवेक्षीय अधिकारी जी. टी. टाक यांनी चोख नियोजन केले.. विज्ञान शिक्षक आर.सी. बडगुजर, एन. डी पाटील, डी. डी. जाधव, आर. आय. सूर्यवंशी, व्ही. एच. चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.. सर्व शिक्षकांनी योग्य तयारी साठी सहकार्य दिले..