सानेगुरुजी विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक डी. ए. धनगर यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल खा. उन्मेश पाटील यांचेकडून पत्राद्वारे कौतुक

सानेगुरुजी विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक डी. ए. धनगर सर यांचे
उल्लेखनीय कार्याबद्दल खा. उन्मेश पाटील यांचेकडून पत्राद्वारे कौतुक
अमळनेर- विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया गतिमान करण्यासाठी वर्ग ग्रंथालय योजना सुरु करून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचे जतन-संवर्धन करीत शैक्षणिक व सांस्कृतिक कला, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक डी. ए. धनगर यांचे जळगावचे खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांनी पत्र पाठवून विशेष कौतुक केले आहे.
खा. उन्मेषभैय्या पाटील यांनी डी. ए. धनगर सर यांचे अभिनंदन कौतुक करीत पत्रात म्हटले आहे की, आपण शैक्षणिक तसेच सांस्कृतिक आणि कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहात नुकतेच आपण विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचे जतन, संवर्धन वृद्धिंगत करण्यासाठी वर्ग ग्रंथालय योजना सुरु करून ‘वाचक वीर स्पर्धा’ राबविली यात प्रथम दुर्गेश पाटील, द्वितीय- प्रतिक कड, तृतीय- विवेक निकम’ या सर्वांसह सहभागी वाचक विरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा…
मुळातच मानवी जीवनामध्ये शिक्षण क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपणासह सर्व सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींसह, मार्गदर्शक सहशिक्षकांचेही हार्दिक अभिनंदन आपण सर्व घेत असलेल्या कठोर परिश्रमांचेच हे फळ होय तसेच आपल्या हातून राष्ट्रहिताचे शैक्षणिक व सामाजिक कार्य निरंतर घडत रहावे, पुन्हा एकदा भावी वाटचालीस मी व माझ्या कुटुंबिय, मित्र परिवाराकडून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….!