बेवारस फिरणाऱ्या वृध्देला क्रांती चौक पोलिस व माणुसकी समूहाने दिला मायेचा आधार


बेवारस फिरणाऱ्या वृध्देला क्रांती चौक पोलिस व माणुसकी समूहाने दिला मायेचा आधार
औरंगाबाद प्रतीनिधी:
निराधार अवस्थेत फिरणाऱ्या जयश्री प्रकाश शहा वय ५० वर्ष गेल्या ७ वर्षापासून क्रांती चौक पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस अवस्थेत फिरत होत्या , एवढ्या कडक उन्हात त्या फिरत असल्याने मळालेले कपडे, हातात एक पिशवी, पायात चप्पल देखील नाही.पोटात अन्नाचा कण नाही त्यांच्याकडे पाहून
सावित्रीबाई फुले महिला राज्य गृह च्या अर्पना सुर्यवंशी यांनी माणुसकीच्या नात्याने त्या महिलेस विचारपूस केली.असता त्यांच्या लक्षात आले की सदर महिला खुप मोठा दुखाःचा डोंगर घेवुन चालण्याचा त्राण ही शरीरात उरलेला नसतांना वन-वन फिरत आहेत,त्यांना कदाचित घराबाहेर काढले असावे.त्यांची अस्थेने विचारपुस करत असतांना त्या वृध्देला गहीवरुन आले त्यांना अश्रू अणावर आले त्या रडायला लागल्या जणू त्यांचे या जगात कोणीही नाही. अपर्णा सुर्यवंशी व्यवस्थापक सावित्री बाई फुले महिला राज्य गृह यांनी तौया वृध्देस धीर देत,
सदरील महिलेची माहिती क्रांती चौक पोलीसांना दिली की गेल्या काही दिवसांपूर्वी त्या वृद्धेला आम्ही सहारा दिला परंतु आमचे सेंटर शासकीय असल्याने वृध्द महिलेला ठेवता येत नाही, त्यामुळे त्या आजीबाईस ते क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. त्या वेळी ती वृद्ध महिला काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या ,पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी बेवारस व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित यांना फोनद्वारे माहिती देवून क्रांती चौक पोलीस ठाण्यात बोलावून घेतले,व सदरील वृध्द महिलेची ची माहिती दिली.त्यानंतर समाजसेवक सुमित पंडित यांनी त्या आजीला प्रेमाने आई म्हणून हाक मारली तिला धीर देत आपुलकीने विचारपूस केली. आणि त्यांना बोलते केले. सदरील महिलेने त्यांच्यावरील आपबिती सांगायला सुरुवात केली, त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मु.पो. रोहकल ता. पारंडा जि. उस्मानाबाद येथील असल्याचे वृद्धेने सांगितले. त्यांच्या पुढील पुनर्वसनासाठी पोलीस निरीक्षक संतोष अ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कागदोपत्री पूर्तता करून नव्याने सुरू झालेल्या माणुसकी वृद्ध सेवालय,धोपेश्वर,फाटा जटवाडा येथे अन्न वस्त्र निवारा येथे समाजसेवक सुमित पंडीत घेऊन गेले व त्यांच्या पुढील राहण्याची व्यवस्था माणुसकी वृद्ध सेवालय हे घेणार असल्याचे सांगितले. या सामाजिक कार्यामध्ये पोलीस निरीक्षक संतोष अ.पाटील,
पोलीस उप निरीक्षक छोठुराम ठुबे,समाजसेवक सुमित पंडित,
क्रांती चौक पोलीस कर्मचारी, व अर्पना सुर्यवंशी महिला राज्य ग्रुह अधीक्षक,पुजा पंडीत ,संचालक माणुसकी वृध्द सेवालय, डॉ.रंजना प्रशांत दंदे, प्रा.शरद सोनवणे आदींनी मदत कार्य केले.
====================
त्यांना’ दुःख देण्याचा आमचा काय अधिकार
ज्या आई-वडिलांनी आम्हाला लहानाचे मोठे केले स्वतःचे दुःख सहन करून आम्हाला सुखाची सावली दिली. असे असताना जेंव्हा आई-वडिलांना एकटे सोडून देणे ही माणुसकी नाही ही समाजातील कोणत्याही आई-वडिलांना त्रास न देता त्यांची सेवा केली पाहिजे.ज्यांच्या मुळे आम्ही जग पाहिले त्यांना दुःख देण्याचा आमचा कोणताही अधिकार नाही.
——-समाजसेवीका सौ.पुजा सुमित पंडित