साहित्य क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप नाही !-शिक्षण मंत्री दीपक केसरकर

साहित्य क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप नाही !
शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर आज अचानक मंत्रालयातील पत्रकार कक्षात आले. सहजच पत्रकारांना भेटायला आलो आहे. राजकीय व्यक्ती व त्यामध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते आले म्हटल्यावर अनौपचारिक गोष्टी बरोबर राजकीय चर्चा व पत्रकार परीषद झाली. चर्चेचा विषय साहित्य क्षैत्रातील पुरस्कार रद्द करण्याचा. पत्रकारांच्या फैरीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सडेतोड उत्तरे दिली. राज्य सरकार साहित्य क्षेत्रात कधीच ढवळाढवळ करणार नाही परंतु नक्षलवादी कारवाईत बळी पडलेल्या जवानांच्या भावनाही दुखावणार नाही असे प्रतिपादन मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी केले ह
राज्य सरकारने कोबाड गांधी लिखीत फ्रॅक्चर्ड फ्रीडम
या अनघा लेले यांनी अनुवादीत केलेल्या पुस्तकाला
जाहीर केलेला पुरस्कार रद्द केल्याने मराठी साहित्य
विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. साहित्यिकांनी
शासकीय समित्यांवरील पदांचे राजीनामे देण्यास
सुरूवात केली आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या
लेखकांनी देखील पुरस्कार नाकारून राज्य सरकारचा
निषेध केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
लक्ष्मीकांत देशमुख यांनी देखील आता राज्य
सरकारच्या भाषा सल्लागार समितीचा राजीनामा दिला
आहे.
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत कोबाड
गांधीलिखित आणि अनघा लेले अनुवादित ‘फ्रॅक्चर्ड
फ्रीडम’ या पुस्तकाला घोषित झालेला अनुवादित
श्रेणीतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार
जाहीर झाला होता. मात्र राज्य शासनाने हा पुरस्कार
रद्द केला. त्यानंतर साहित्य विश्वात मोठी खळबळ
उडाली. अनेक साहित्यिकांनी सरकारच्या या निर्णयाचा
निषेध केला आहे.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मते शासन कोणत्याही नक्षलवादी पुरस्कृत लेखकांच्या लेखनाचा सन्मान करणार नाही. साहित्यिक हे समाजातील महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यांचे लेखन समाजाभिमुख असावे. अशी शासनाची भूमिका आहे. नामवंत साहित्यिक व संबंधित व्यक्ती यांच्या चर्चेनंतरच शासन निर्णय जाहीर केला आहे. राजीनामा देऊन असंतोष व्यक्त करणाऱ्या साहित्यिकांशी सकारात्मक चर्चा केली जाईल असेही पत्रकार परिषदेत सांगितले गेले.
साहित्य हे समाजाचा आरसा असल्याने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर योग्य ती भूमिका घेतली व या वादावर पडदा टाकतील असा विश्वास ग्रंथपाल आरती शर्मा यांनी आमच्या प्रतिनिधी कडे व्यक्त केला.