नैसर्गिक वातावरणात रंगले माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सन.१९९२-९३ दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा श्री शरद रघुनाथ चौधरी (प्रगतशील शेतकरी)यांच्या शेतात नैसर्गिक वातावरणात पार पडला.
सन १९९२-९३ चे माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यासाठी गावातील तसेच बाहेरगावी असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल ३०वर्षांनी वेळ काढून एकत्र आले राज्यातील नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले ५० विद्यार्थी व २५ विद्यार्थिनींनी कुटुंबासह या गेट-टुगेदरला हजेरी लावली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य श्री जी आर चौधरी यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर सूत्रसंचालन श्री विकास पी महाजन सरांनी केले आणि या स्नेहसंमेलनासाठी मोलाचे मार्गदर्शन श्री. डी डी राजपूत सर आणि श्री.आर आय सूर्यवंशी सरांनी केले या कार्यक्रमाला सर्व टीचर्स व शिपाई यांनी हजेरी लावली या स्नेहसंमेलनासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीं त्यांच्या कुटुंबासह आले होते कार्यक्रमाच्या अगोदर शाळेत फोटोसेशन झाले व सरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला सरांनी एक छोटासा खो खो हा खेळ खेळला.आणि वर्गात १कविता शिकवली अशा उत्सवाच्या आणि नैसर्गिक वातावरणात गेट टुगेदर चा कार्यक्रम पार पडला.
