
सामाजिक कामाला प्राधान्य देणारे मा.नगरसेवक नरूभाऊ चौधरी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर नगर परिषदेत प्रभाग एकमध्ये नगरसेवक असतांना सामाजिक कामाला प्राधान्य देत नरूभाऊ यांनी सामाजिक कार्य जिवंत ठेवले व आपल्या प्रभागामध्ये कोरोना सारख्या परिस्थितीत समाजिताला जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी राहिले .त्यांच्या धर्मपत्नी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या. त्यांनीही चांगल्या प्रकारे काम करून जनतेच्या मनामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. माननीय आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांनी अमळनेर नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामे केलेली आहेत. चौधरी बंधू नेहमी समाज हित जोपासत असतात व जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देतात. नरूभाऊ चौधरी अत्यंत मितभाषी व्यक्तिमत्व आहे. नगरसेवक असतांना त्यांनी आपल्या प्रभागांमध्ये अनेक विकास कामे करत विविध प्रकारचे शिबिर आयोजित केली आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी दोन शब्द
आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं
तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात…
काही आपली माणसं !
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि
कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच,
आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…
🎂💐💐💐💐🎂
शुभेच्छुक
नरूभाऊ चौधरी मित्रपरिवार अमळनेर
प्रभाग -1
