• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर शाळेत विविध मैदानी स्पर्धा संपन्न

Feb 2, 2023

Loading

श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर शाळेत विविध मैदानी स्पर्धा संपन्न

अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत दोन दिवशीय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मुख्याध्यापक संदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थाध्यक्ष श्री प्रकाशभाऊ मुंदडा, संचालक अमेय मुंदडा, योगेश भाऊ मुंदडा यांनी शुभेच्छा दिल्या. सदर मैदानी स्पर्धेत फुगा शर्यत , वन मिनिट शो, शारीरिक गती, पाणी वाचवा- पाणी साठवा ,पट्टी बॉल बॅलन्स, गणिती खेळ, आपला फुगा वाचवा- दुसऱ्याचा फोडा, पिकअप बॉटल, चेंडू बाटलीने टोलवणे, चक्रसाखळी इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची शारीरिक ,मानसिक, भावनिक, चपळ वृत्ती, एकाग्रता , संग्रहीवृत्ति, मित्रता, मिळून मिसळून राहणे, सांघिक प्रवृत्ती, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. न्यूनगंड दूर होतो ,आणि आपलं वेगळं स्किल विद्यार्थी या ठिकाणी दाखवत असतो. सदर स्पर्धेचे परिवेक्षकीय कामकाज पी.एम .ठाकरे यांनी केले. तंत्रनिदेशक म्हणून एस. एस. ते मॅडम व्हि . डी. पाटील आणि डी. एस. कारले यांनी केले. मुलींच्या स्पर्धेसाठी बी .एस. चव्हाण, सी डी. निकम, ए. यु. महाजन, पी .पी. पाटील, एस. एस. तेले मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. मुलांच्या स्पर्धेसाठी ए.पी. जाधव, वाय.जे. पाटील ,आर.डी. महाजन यांनी मोलाची भूमिका बजावली. सदरच्या स्पर्धेत इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवण्यात आला. सदर स्पर्धेचे काटेकोरपणे नियोजन उपक्रमशील शिक्षक श्री डी .ए. सोनवणे यांनी करून आकर्षक बहारदार सूत्रसंचालनही केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी चतुर्थ कर्मचारी अशोक सैंदाणे यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्व स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *