• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

खा. शि. मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची रुग्णालयास अभ्यास भेट

Feb 2, 2023

Loading

खा. शि. मंडळाच्या फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची रुग्णालयास अभ्यास भेट

अमळनेर : येथील खान्देश मंडळ संचालित स्व. श्री पंढरीनाथ छगन शेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील महारष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालित ग्रामीण रुग्णालयास अभ्यास भेट देवून रुग्णालयात प्रत्यक्ष कश्या पद्धतीने कामकाज चालते या बाबतीत माहिती घेतली
फार्मसी कोन्सील ऑफ इंडिया, न्यू दिल्ली यांच्या नवीन शैक्षणिक धोरण (Education Regulation 2020) मध्ये प्रत्यक्ष फिल्ड विझिट ला प्राधान्य देण्यात आले असून त्यात रुग्णालय भेटीस वर देखील भर देण्यात आला आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना रुग्णालयातील कामकाजाविषयी ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर डी. फार्मसीचे विद्यार्थी रोजगाराच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी (फार्मासिस्ट) म्हणून कार्यरत होतात. त्यावेळी त्यांना अडचणी यायला नको व विभागनिहाय कामाचे स्वरूप कसे असते आदी विषयांना लक्षात घेवून हि अभ्यास भेट घेण्यात आली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे , डॉ. संदीप जोशी , डॉ. सुमित पाटील, श्री अश्वमेघ पाटील व विविध विभागातील कार्यरत अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
या अभ्यास भेटीसाठी महाविद्यालयाचे डिप्लोमा फार्मसी विभाग प्रमुख प्रा. रविंद्र माळी, प्रा छाया महाजन व महेश वाणी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी खा. शि. मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख व माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे , फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन नीरज अग्रवाल, प्राचर्य रविंद्र सोनवणे समस्त संचालक मंडळाचे सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *