

एम ए पाटलांना ग्रामीण व शहरी भागात मिळतोय प्रतिसाद….
सहकार पँनलचे प्रमुख एस.डी.भिरूड यांच्या पँनलला सभासदांची पसंती….
अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सार्वत्रिक निवडणूक 2022 2023 टीडीएफ प्रणित जळगांव जिल्हा मुख्याध्यापक संघ जळगाव, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदारसंघाचे पाटील मधुकर आनंदा (एम ए पाटील) यांची निशाणी कपबशी असून ते मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल जुनियर कॉलेज तांबेपूरा अमळनेर येथे कार्यरत आहेत,ते माजी अध्यक्ष अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघ व हिशोब तपासणी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ म्हणून कार्यरत आहेत.
सहकार पॅनलचे प्रमुख शालिग्राम भिरूड यांनी अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे त्यांना विविध संघटनेचा पाठिंबा आहे. अमळनेर तालुक्यात त्यांच्या मित्र परिवाराचा प्रचार जोरात सुरू असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे..
अमळनेर तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, कलाध्यापक संघटनेचे आर.डी चौधरी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व शिक्षकेत्तर संघटनेचे पदाधिकारी विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकेत्तर संघटनेचे पदाधिकारी यांनी केले आहे.