
अडावद आरोग्य केंद्रात जागतिक ‘कर्करोग दिन’ व ‘स्वच्छता दिवस’ केला साजरा.
जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.तुषार देशमुख व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांचे मार्गदर्शना खाली दिनांक-०४ फेब्रुवारी २०२३ शनिवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद येथील सर्व डॉक्टर,आरोग्य कर्मचारी व रुग्णांच्या यांच्या उपस्थितीत कर्करोग दिन व स्वछता दिवस देखील साजरा करण्यात आला.
प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय पाटील यांनी उपस्थित बाह्यरूग्ण व सर्व कर्मचऱ्याना कर्करोगा विषयीची सविस्तरपणे माहिती देऊन मार्गदर्शन केले,त्यात त्यांनी स्त्रियांच्या स्तनामधील कर्करोगाविषयी विशेषतः मार्गदर्शन केले,
तसेच कर्करोगामुळे केसांचा कर्करोग, डोळ्यातील कर्करोग, तोंडाचा कॅन्सर, फूफुसाचा कर्करोग,हृदयातील,पोटातील कर्करोग असे कर्करोगाचे आपल्या मानवीय शरीरात शिरकाव होत असतो,
त्याकरिता सर्वात आधी आपल्या सवयी, आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते, आणि वेळोवेळी वरीलप्रमाणे लक्षणं दिसून आल्यास आपल्या तपासण्या करणे देखील गरजेचे आहे,
असे डॉ.अक्षय यांनी सांगितले.
तदनंतर सर्व डॉ./आरोग्य कर्मचारी वर्ग यांनी आरोग्य केंद्राचा परिसर सफाई करून स्वच्छता दिवस साजरा केला.
कार्यक्रमा प्रसंगी.. वैद्यकीय अधिकारी-डॉ. अक्षय पाटील,आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख,आरोग्य सहाय्यीका-शोभा चौधरी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-गणेश महाजन, धुडकु वारडे, आरोग्य सेवक-विजेन्द्र पवार, आरोग्य सेविका-सी.के.बाविस्कर, प्रियंका महाजन, सचिन महाजन, डेटा ऑपरेटर-अजय भोई, मनोज चावरे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.