• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

वर्ल्ड पार्लमेंटकडून काव्य प्रतिभेबरोबरच पर्यावरणासह सर्वच क्षेत्रातील गुणवंताना गौरविले जाणार !

Feb 4, 2023

Loading

वर्ल्ड पार्लमेंटकडून काव्य प्रतिभेबरोबरच पर्यावरणासह सर्वच क्षेत्रातील गुणवंताना गौरविले जाणार !

श्रीरामपूर : –
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) म्हणजेच जागतिक संविधान व संसद संघातर्फे सन २०२३ मध्ये विविध क्षेत्रातील गुणवंताना सन्मानीत करण्याची आपली योजना जाहीर करण्यात आली आहे.
“आई ” या विषयावरील आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेच्या आयोजना बरोबरच पर्यावरण क्षेत्रात उत्तुंग कर्तबगारी बजावणाऱ्या गुणवंताना तसेच समाजाच्या कला, क्रिडा, साहित्य व इतर सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविले जाणार आहे.
“आई ” या ममत्वाच्या विषयावर देशातील मराठी भाषिक कवी / कवयत्रींसह परदेशातील मराठी काव्यप्रतिभेने आपल्या स्वरचित काव्यरचना पाठविल्या आहेत त्यांना ” वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पोएट्री अवॉर्ड २०२३ ” हा देण्यात येणार आहे.
पर्यावरण क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संस्था व वैयक्तीक गुणवंतांसाठी ” वर्ल्ड पार्लमेंट क्लायमेट एमिसरी अवॉर्ड २०२३ ( आंतरराष्ट्रीय पर्यावरणदूत पुरस्कार ) देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर वर्ल्ड पार्लमेंटचा सर्वोच्च पुरस्कार “वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२३” सर्वच क्षेत्रातील गुणवंताना देण्यात येणार आहे.
तरी संबंधीत क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या स्त्री / पुरुष यांनी वैयक्तीक तसेच संस्थात्मकदृष्टया उठावदार कार्य करणाऱ्या संस्थांनी स्वतःची सविस्तर माहिती असलेला प्रस्ताव, नव्याने काढलेला ऑफिसीएल पासपोर्ट फोटो / लोगो wcpashrirampur@gmail.com
या मेल आयडीवर पाठवावा. तसेच सदर वृत्त इतर गुणवंतापर्यंत पोहोचवावे.
येत्या मार्च महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत एका आकर्षक सोहळ्यात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. तसेच याच कार्यक्रमात निमंत्रीतांचे काव्य संमेलन रंगणार आहे.
तरी इच्छुकांनी त्वरीत आपला प्रस्ताव पाठवून ९०९६३७२०८२ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *