• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

श्रीसंत सेना नाभिक समाज सेवा मंडळातर्फे शहादा येथे 10 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Feb 6, 2023

Loading

श्रीसंत सेना नाभिक समाज सेवा मंडळातर्फे शहादा येथे 10 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

नंदुरबार,शहादा ( मनिलाल शिंपी):- समस्त गुजर नाभिक समाज पंच शहादा नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्रीसंत सेना समाज सेवा मंडळ शहादा यांच्यावतीने दि.10 फेब्रुवारी 2023 रोजी दुसऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहादा येथील शहादा तालुका खरेदी विक्री संघ प्रांगणात सकाळी 10:30 वाजता समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ व श्रीसतसेना नाभिक समाज सेवा मंडळाच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा समाजाचा 8 वा व श्रीसंत सेना समाज सेवा मंडळाचा वतीने द्वितीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. केवळ नाममात्र एकवीस रुपयात वर – वधुंची नाव नोंदणी केली जात असून आतापर्यंत 22 उपवर – वधू म्हणजे 11 जोडप्यांची नोंदणी झाली आहे. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता हळद, सार्थक, पुजाविधी, भोजन, रात्री रासगरबा व दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता नवरदेवांची शोभायात्रा मिरवणूक, अंबाजी माता मंदिर खेतिया रोडपासून खरेदी विक्री संकुल पर्यंत निघणार आहे, सकाळी 10:30 वाजता सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात वर-वधु पालकांची स्वतंत्र बैठक व्यवस्था, धार्मिक विधीसाठी स्वतंत्र पुरोहित, फोटोग्राफर व्हिडिओ चित्रीकरण विविध संसार उपयोगी साहित्य वितरण विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरण, वाजंत्री समाज प्रथे प्रमाणे हळद, नवग्रह शांती यज्ञ, पेहरावणी, पाणेतर, सत्यनारायण कथा, विदाई आदी सर्व विधी भोजनावळ, स्वतंत्र मंडप, विवाह पत्रिका, वर- वधू व पालकांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, फिरते शौचालय, मंडपात सी. सी. टि. व्ही. कॅमेरा, ड्रोन कॅमेरा, वॉकी टॉकी, डॉक्टर, प्रथमोपचार कक्ष, रुग्णवाहिका, अग्निशामक बंबाची गाडी, मोठा एल. ई. डी. टि. व्ही. संच, विविध प्रकारच्या सामाजिक माध्यमांवर सरळ प्रक्षेपण आदी सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे, या विवाह सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्यातील सहभागी वधू मातेस महिला व बालकल्याण विभागाच्या कन्यादान योजनेच्या माध्यमातून दहा हजर रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बेटा बेटी एकसमान, बेटी बचाओ बेटी पढाओ, अन्न, पाणी वाचवा असा संदेश देणारी जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत. हळद समारंभ, बिदाई ते सत्यनारायण कथा असा दोन दिवस चालणारा हा परिसरातील एकमेव आगळा वेगळा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश आदी राज्यातील चार ते पाच हजार समाज बांधव व आप्तेष्ट उपस्थित राहण्याची शक्यता आहे, तसेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सहकार, विविध प्रसार माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यातील भोजनावळीकरिता अनेक दानशूर दात्यांनी अन्नदानासाठी मदत करीत आहेत. याकामी समाजातील विविध संस्था, संघटना, तरुण, महिला मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे, या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, समाज पंच मंडळ व विविध संघटना अहोरात्र परिश्रम घेत आहेत.अशी माहिती संत सेना नाभिक सेवा मंडळाचे सदस्य समाजसेवक परीवर्धे येथील समाजसेवक श्री.यशवंत जाधव,किशोर लिमजी जाधव, तुकाराम काशिनाथ जाधव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमाची माहिती मिळाली . खरोखर संत सेना नाभिक सेवा मंडळाच्या सामुदायिक विवाह उपक्रम म्हणजे नावीन्यपूर्ण आणि संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अभिमानास्पद उपक्रम आहे त्याबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *