• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यातून अपक्ष उमेदवार तुषार बोरसे विजयी

Feb 6, 2023

Loading

जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यातून अपक्ष उमेदवार तुषार बोरसे विजयी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीचा निवडणुकीची निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
त्यात जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीत सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. सहकार पॅनल प्रमुख दादासाहेब एस.डी.भिरूड
यांच्या पॅनलच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. सहकार पॅनलच्या 5 जागा बिनविरोध झाल्या होत्या. निवडणुकीत सहकार पॅनलच्या 10 जागा निवडून आल्या म्हणजे सहकार पॅनलच्या 15 जागा निवडून आल्या.
तर अपक्षाच्या 6 जागा आल्या.
अमळनेरमध्ये सहकार पॅनलचे एम. ए पाटील व अपक्ष उमेदवार तुषार बोरसे यांच्यामध्ये लढत होती त्यात तुषार नारायण बोरसे यांना 529 मते मिळाली व ते विजयी झाले व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मधुकर आनंदा पाटील यांना 243 मते मिळाली.
अपक्ष विजयी उमेदवार तुषार बोरसे यांचा निवडणुकीत यश संपादन केल्याबद्दल विविध संघटनेच्या वतीने व मित्रपरिवार त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed