जुन्या पेन्शन योजनेसाठी
१४ मार्च २०२३ पासूच्या बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हा
माध्यमिक शिक्षक संघाचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
संपूर्ण देशात विविध राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही अनेक कर्मचारी जुनी पेन्शनपासून वंचित आहेत त्यांच्या मागणीसाठी 14 मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी संपात सहभागी व्हावे असे आवाहन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी एस.डी भिरुड यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
सविस्तर माहिती अशी कि महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांची राज्य कार्यकारिणीची सभा नाशिक येथे
दिनांक १२/०२/२०२३ रोजी संपन्न झाली. या सभेत दिनांक ०९/०२/२०२३ रोजी पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत “बेमुदत संप ” करण्यासंदर्भातील मंजूर झालेल्या ठरावावर चर्चा झाली व राज्यव्यापी बेमुदत
संप करण्याबाबतचा ठरावास एकमताने मंजुरी दिली. निर्णयानुसार या राज्यव्यापी संपात सहभागी होण्याचे निश्चित केलेले आहे. या संपात महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन ) ने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार नवीन पेन्शन योजना रद्द सर्वांना जुनी पेन्शन योजना या मागणीसाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी दिनांक १४ मार्च २०२३ पासूनच्या बेमुदत संपात सहभागी व्हावे.
तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना आपल्या स्तरावरून परिपत्रक काढून संपात सहभागी होणेबाबत कळविण्यात यावे. तसेच मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा पोलिस अधिक्षक व मा.शिक्षणाधिकारी माध्य. जिल्हा परिषद व संबंधित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष / सचिव यांना देखील संपाबाबत आगावू
सुचना मा. मुख्याध्यापक यांच्या मार्फत देण्यात यावी.
संपाच्या दिवशी मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई ३२ यांना सादर करावे. तसेच स्थानिक जिल्हा पातळीवर राज्य सरकारी कर्मचारी
मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेशी संपर्क साधून त्यांनी आयोजित केलेल्या मोर्चा/धरणे / निदर्शने आंदोलनात सहभागी व्हावे अथवा संयुक्तपणे आंदोलनाचे आयोजन करावे एस्. डी. भिरुड
सेक्रेटरी,ज्ञानेश्वर कानडे अध्यक्ष
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) , एच जी इंगळे अध्यक्ष, एस एन पाटील कोषाध्यक्ष, बी.डी महाले संघटक ,आर आर पाटील उपाध्यक्ष ,साधना लोखंडे उपाध्यक्षा व सर्व कार्यकारी सदस्य जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांनी केले आहे.