• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कावपिंप्री येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Feb 25, 2023

Loading

कावपिंप्री येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

कावपिंप्री-ता.अमळनेर- येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ कावपिंप्री, संचलित सर्वोदय माध्यमिक विद्यालयात, एस.एस.सी विद्यार्थ्यांना नुकताच भावपूर्ण निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मनोहर वल्लभराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालय जिराळी इंधवे, या शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश जाधव व, सेवानिवृत्त शिक्षक श्री लोटन गुरुजी हे होते. विद्यालयाचे, उपशिक्षक श्री सुरेश महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नंतर विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले . प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञतापूर्वक व भावपूर्ण मनोगत व्यक्त झाली. श्री गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षा देण्याचे आवाहन केले . श्री लोटन गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य जोपासण्याच्या सूचना दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय महाजन यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून उज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर पोलीस पाटील श्री .भानुदास आबा श्री लोटन गुरुजी. श्री. मनोहर पाटील ,गणेश जाधव. श्री. अनिल वसंतराव पाटील.,श्री भ. भारत साहेबराव पाटील, विजय पाटील होते . तर पालक भाईदास भटा पाटील जितेंद्र पाटील ,नारायण मिठाराम पाटील, उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही एस पाटील तर आभार श्री विलास सैंदाणे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् ने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *