• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अर्वाच्य आणि अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पवार यांना निलंबित करा अन्यथा काम बंद आंदोलन.- रामकृष्ण बी.पाटील.

Feb 26, 2023

Loading

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना अर्वाच्य आणि अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पवार यांना निलंबित करा अन्यथा काम बंद आंदोलन.- रामकृष्ण बी.पाटील.

अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल पवार यांनी दि.२३ फेब्रुवारी रोजी आयोजित आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मासिक बैठकीत आले असता आशा स्वयंसेविकांचे मोबाईलवर नवरे बोलत असतील तर त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना साडी आणि बांगड्या घालून प्राथमिक आरोग्य केंद्रात कामाला पाठवा अशा स्वरूपाचे शब्द प्रयोग करून उपस्थित आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचा आपमान केला आहे तसेच गटप्रवर्तकांनी कामाकाजाबाबत मार्गदर्शन मागितले असता मी तुमचा अधिकारी नाही आणि मला काहीही विचारायचे नाही असे बेजबाबदारपणाची उत्तरे देत असतात.
याबद्दल सुमारे तिस आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी दि.२४ फेब्रुवारी रोजी डॉ.पवार यांच्या वर्तनाबद्दल आणि झालेल्या प्रकाराची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीष गोसावी यांचेसह संघटनेकडे केली आहे.
डॉ.पवार यांच्याविरोधात याआधीही महीला कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत परंतु ते स्थानिक असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आणि माझे कोणीही काही बिघडू शकत नाही अशा आविर्भावात वावरत आहेत.
डॉ.पवार यांच्या वर्तनामुळे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना वारंवार अपमानास्पद मिळत असल्याने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे मनोधैर्य खचत असून मानसिक तणावाखाली काम करीत आहेत परिणामी योजनेच्या कामाच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होतोहेत.म्हणून डॉ.पवार यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केली आहे अन्यथा जिल्हाभर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कामबंद आंदोलन छेडतील असा इशारा ही पाटील यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *