
संघर्षाचा लढा इयत्ता 10 वी/12 वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार
2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनीच पेन्शन मिळावी म्हणून आपण आतापर्यंत सर्वच पेन्शन पीडित बांधवांनी प्रामाणिकपणे अनेक संघर्षाचे लढे केलेले आहेत. यश, अपयश हे प्रामाणिकपणे लढणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना महत्वाचे नसतात. त्यांना प्रत्येक क्षणाला प्रयत्न करणे एवढेच ध्येय असते.
त्यामुळेच बांधवांनो आता आपण महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय संगीता ताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इयत्ता 10 वी व12 वी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीच्या सर्वच कामकाजावर सर्वांनी अखंड महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकावयाचा आहे.
यामध्ये कोणीही शासनाच्या कोणत्याही कार्यवाही वर विचार करावयाचा नाही. कारण हा निर्णय तुमचा तुमच्या एकट्याचा नसून संघटनेचा आहे. त्यामुळे कोणतेही कार्यवाही महाराष्ट्र शासनाने केली तर ती संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर होईल. त्यामुळे बांधवांनो आपण 10 वी, 12वी बोर्ड परीक्षेवर टाकलेला बहिष्कार 100 टक्के यशस्वी करावयाचा आहे.
आपल्याला पेन्शन मिळवण्यासाठी हा रणनीतीचा पहिला टप्पा असेल. त्यानंतर आपण आता मवाळ धोरण सोडून देऊन, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचीही रणनीती आखणे काळाची गरज आहे.
27 फेब्रुवारी 2023 रोजी पुणे या ठिकाणी 10 वी व 12 वी बोर्ड विभाग, आयुक्त कार्यालय व शिक्षण उपसंचालक या सर्वांना या बहिष्काराचे निवेदन द्यावयाचे आहे. तसेच बाकीच्या नऊ उपविभागीय कार्यालयावर व 36 जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयावर आपल्याच पेन्शन पिडीत बांधवांनी, याच पद्धतीने बहिष्कारचे निवेदन 27 फेब्रुवारी याच दिवशी द्यावयाचे आहे. त्या पद्धतीने नियोजन त्या विभागातील पेन्शन पिडीत बांधवांनी करावे, व प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी.
त्यामुळे ज्या पेन्शन पीडित बांधवांना शक्य होईल त्यांनी मोठ्या संख्येने पुणे या ठिकाणी सकाळी 11:30 वाजता आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी उपस्थित राहावयाचे आहे. त्या ठिकाणी आपण सर्व पत्रकार बंधू व इलेक्ट्रिक मीडिया या सर्वांना घेऊन पत्रकार परिषद घेणार आहोत, कृपया पुणे या ठिकाणी येणाऱ्या बांधवांनी, भगिनींनी कृपया संपर्क साधावा ही विनंती, धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏
आपलेच पेन्शन पीडित बांधव
प्रा. दिलीप डोंगरे अहमदनगर
सुदेश जाधव कोल्हापूर