• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही
आमदार अनिलदादा पाटील यांनी अमळनेरला दिव्यांग तपासणी शिबिरावेळी प्रतिपादन

Feb 26, 2023

Loading

मतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही

आमदार अनिल भाईदास पाटील यांनी येथील दिव्यांग तपासणी शिबिरावेळी प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी
मतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसून, प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी येथील दिव्यांग तपासणी शिबिरावेळी दिले. आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन येथील इंदिरा गांधी भवन येथे आयोजित करण्यात आले होते. मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी आमदार अनिल पाटील यांच्या आमदार निधी २०२२-२३ अंतर्गत दिव्यांग तपासणी शिबिराचे भव्य आयोजन २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.यावेळी ५०० पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांची नोंदणी तसेच तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली असून लवकरच सर्वच गरजू लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे.यावेळी आमदार अनिल पाटील यांनी दिव्यांगांच्या विविध समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले तसेच पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिव्यांगांसाठी भरीव कार्य करण्याचे आदेशच यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.कुठला निधी मिळेल न मिळेल त्याची पर्वा न करता माझा आमदार निधी व मी मात्र दिव्यांगांसाठी त्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद असल्याचे त्यांनी सांगितले.

500 पेक्षा अधिक दिव्यांगानी घेतला लाभ,,,
 
यावेळी ५०० पेक्षा जास्त दिव्यांगांचे त्यांच्या विविध अवयवांच्या संबंधित मोजमाप झाले, यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रप्रमुख एस.पी गणेशकर, मुंबई येथील डॉक्टर जयपुर फुट चे तज्ञ सुरेंद्र तोमर व त्यांची टीम,ग्रामीण चे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे व त्यांची टीम उपस्थित होती, यावेळी व्यासपीठावर जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील, ग्रंथालय प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, गणेश बाविस्कर साहेब, राष्ट्रीय विकलांग पार्टी जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ, बिरजू नाना, अमोल पाटील, अनिता ताई, देविदास देसले, प्रा.अशोक पवार, सुनिल शिंपी, सचिन वाघ, गिरीश सोनजी पाटील, प्रा.मंदाकिनी पाटील, गौरव नाना पाटील, विनोद कदम, उमाकांत साळुंखे, नगरसेवक दीपक पाटील, मुन्ना पवार, बाळू पाटील, इम्रान खाटीक, रफीक मिस्तरी, मुर्शिद शेख, अबिद मिस्तरी, भुरा पारधी, बाबा शेख, निनाद शिसोदे, अनिरुद्ध शिसोदे, सनी गायकवाड, गणेश पाटील आदी उपस्थित होते.
    
यावेळी प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते देविदास देसले यांनी केले,तर दिव्यांगांच्या विविध योजनांसंबंधी गणेश बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.दिव्यांगांतर्फे खवशी येथील प्रसाद कापडे यांनी आमदार अनिल यांच्या कार्याचे स्वागत करत दिव्यांग बांधव नेहमीच आमदार अनिल पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभे राहतील हे आश्वासन दिले.सूत्रसंचालन विनोद कदम यांनी तर आभार दीपक पाटील यांनी मानले.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय-

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय होणार असल्याने तालुक्यावर सोयी सुविधा उपलब्ध होणार असून तालुक्यातील दिव्यागांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र तसेच इतर सुविधा तालुक्यातच मिळाव्या यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या विकास निधीतून ५% राखीव असलेला निधी दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

पुढील टप्प्यात साहित्याचे वाटप-

तपासणी केलेल्या दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल, व्हील चेअर, एल्बो कुबडी, कुबडी, काठी, रोलेटोर वॉकर, कलीपर्स, श्रवणयंत्र, मतिमंद किट तसेच विविध कृत्रिम अवयव वाटप करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *