• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

Feb 28, 2023

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रमण यांचे जीवन प्रेरणादायी – मुख्याध्यापक जे एस पवार.

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.टी.माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. सर्वप्रथम जेष्ठ विज्ञान शिक्षिका पी आर सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते नोबेल पारितोषिक विजेते भारताचे थोर शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विज्ञान विषय शिक्षक सी एम भोळे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. अंधश्रद्धा, कर्मकांड यापासून दूर राहून विज्ञान जोपासावे. विज्ञानाने वर्तमानकाळात केलेली प्रगती ही अतुलनीय आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी विज्ञानाच्या विविध शास्त्रज्ञांचे उदाहरण देऊन त्यांनी केलेले कार्य विशद केले. विज्ञानाची कास धरा छोटे छोटे मॉडेल तयार करा यातून आपल्याला प्रेरणा मिळते. असा मोलाचा संदेश देऊन सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका पी आर सोनवणे, एम के कापडणे, एस व्ही आढावे, एस एन कोळी, एच डी माळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, विज्ञान शिक्षीका श्रीमती व्ही पी वऱ्हाडे, श्रीमती एम जे महाजन तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्ही टी माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *