
दोंडाईचा शिंपी समाज तर्फे जागतिक टेलर्स डे उत्साहात साजरा. (मनिलाल शिंपी हे मानवसेवेचे व्रत घेतलेले खरे आदर्श समाजसेवक आहेत.
::शिवाजी शिंपी ) दोंडाईचा(प्रतिनिधी ) दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स डे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी दहा वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर एका टेलर बांधवांस अशोक जगताप यांना कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान देण्यात आले यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष अशोक जगताप यांच्या शुभहस्ते श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची प्रतिमा पुजन व शिलाई मशिन ची पुजा करण्यात आली तसेच यावेळी योगायोगाने प्रमुख पाहुणे म्हणुन अ.भा.श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मंध्यवंर्ती संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी दोंडाईचा येथे त्यांचे नातेवाईकांला भेटण्यास आले असता आमच्या कार्यक्रमास उपस्थित झाले हे आम्हचे भाग्यच तसेच यावेळी सर्व टेलर बांधवांना कल्याण येथील दानशुर बांधव आर.एस पी कंमान्डर डॉ.मनिलाल भाऊ शिंपी तसेच नाशिक येथील महेंद्र बाविस्कर यांच्या आर्थिक मदतीने सर्व टेलर बांधवांना कपडे कटींग करत असतांना लागणारी सरळ व गोल साईज पट्टी दोन नग आर एस पी युनिट कमांडर,मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे अध्यक्ष डॉ. मनिलाल शिंपी कल्याण व शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात नेहमी तत्परतेने मदतीसाठी धावून येणारे, समाज संघटक श्री महेंद्र बाविस्कर नाशिक यांच्या तर्फे देण्यात आले तसेच दोंडाईचा कर समाज बांधवाचे ही तेवढीच मदत मिळाली यावेळी मंध्यवंर्ती संस्थेवर ज्या समाज बांधवांची निवड झाली त्या सर्व बांधवांच्या गुलाबपुष्प देऊन सत्कांर करण्यात आला तसेच आ.भा.शिंपी समाज मंध्यवंर्ती संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव शिंपी यांनी यावेळी दोंडायचा शिंपी समाजमध्ये एकसुत्री पणा,आणि एकमत आहे याचा आम्हाला अभिमान आहे,तसेच आपल्या समाजाचे, मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे अध्यक्ष, आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी हे मानव सेवेचे व्रत घेतलेले खरे आदर्श समाजसेवक आहेत.अश्या शब्दात कौतुक केले. तसेच मंध्यवंर्ती संस्थेचे संघटक प्रा.प्रकाश भांडारकर जिल्हा अध्यक्ष सुरेश बागुल शहर अध्यक्ष पांडुरंग शिंपी माजी अध्यक्ष हरिदास जगताप यांनी सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केले तसेच दोंडाईचा समाज मंगलकार्यालय बांधकामांस ज्या समाज बांधवांनी मदत दिली त्या देणगीदारांचा अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी यांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जमलेले सर्व समाज बांधवांना अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी उपाध्यक्ष श्री शरद पवार सचिव श्री चंद्रकांत कापुरे सल्लागार प्रा. प्रकाश भांडारकर धुळे सहसचिव प्रा.राजेंद्र कोटुरवार जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बागुल श्री हरिदास जगताप श्री तुकाराम जगताप श्री राजेंद्र गवळे प्रा कैलास कापडणे श्री मनोज मेटकर श्री मधुकर जाधव श्री तुळशिराम जगताप श्री गोवर्धन पवार युवा अध्यक्ष श्री सागर पवार माजी युवा अध्यक्ष श्री सतिश जाधव सचिव श्री हेमंत भांडारकर युवा उपाध्यक्ष श्री योगेश बोरसे श्री नरेंद्र जगताप श्री निलेश चित्ते श्री दिपक पवार श्री महेंद्र जगताप चि. सचिन कापडे जिल्हा युवा अध्यक्ष विशाल कापडे महिला अध्यक्षा सौ भारतीताई जगताप अ.भा.महिला आघाडीच्या सहकोषाध्यक्ष सौ वंदनाताई भांडारकर महिला आघाडीच्या सहप्रसिध्दी प्रमुख सौ सुनिता शिंपी जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ. सुरेखाताई जाधव महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. हेमलता पवार सौ. आशाताई गवळे महिला प्रतिनिधी महिला आघाडी मंध्यवंर्ती संस्था यांनी सहकार्य केले.कार्यक्रमास सर्व समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमांचे उत्कृष्ट सुत्रसंचालन प्रा. राजेंद्र कोंटुरवार यांनी केले