
जि.प. मराठी कन्या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
हिवरखेड येथील जि.प. मराठी कन्या शाळेत मराठी दिनाच्या औचीत्यावर स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. नयनाताई नाचणे , तर उद्घाटक म्हणून हिवरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशालीताई गणेश वानखडे ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थितीत मनीष गिऱ्हे, केंद्रप्रमुख,तेल्हारा पंचायत समिती सदस्या गोकुळा महेंद्र भोपळे, ग्रा.पं.सदस्या मानकर, पोलीस पाटील प्रकाश गावंडे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नयना किशोर नाचणे, उपाध्यक्षा किरण गजानन केदार, निलेश खिरोडकार, मुख्याध्यापक हे होते. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना उपस्थितांनी अभिवादन केले. या स्नेहसंमेलनात लहानग्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध सांकृतिक कार्यक्रमातून आपल्या कला-गुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन यावेळी केले. यावेळी प्रेक्षकवर्ग त्यांनी सादर केलेल्या नाटिका, नृत्य, एकांकिका, वेशभूषा यामुळे मंत्रमुग्ध झालेत. या चिमुकल्यांच्या उल्हासित सादरीकरणाला प्रोत्साहन म्हणून उपस्थितांनी त्यांच्यावर बक्षिसाची लयलुट केली. यावेळी विद्यार्थ्याचे पालक,गावकरी,पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन शिक्षिका सौ.अपर्णा आमले व कु. सुनीता शिळणकर यांनी तर आभारप्रदर्शन जेष्ठ शिक्षिका सौ.साधना भोपळे यांनी केले.