


गणितीय उखाणे घेत मराठी राजभाषा व जागतिक विज्ञान दिन साजरा
ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी )- कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात मराठी राजभाषा व जागतिक विज्ञान दिन संयुक्त रित्या साजरा.मराठी भाषेचा प्रभाव महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही आहे.वर्षानुवर्षे मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे .आचार विचार व संस्कृतीचे माहेरघर म्हणजे मराठी शाळा. मराठी शाळेत प्रवेश घ्या.या विषयावर सम्राट अशोक शाळेच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी अभिनय साजरा करत एक विद्यार्थी अपघात ग्रस्त म्हाताऱ्या आजीला मदत करत दवाखान्यात घेऊन जातो.व आजीला धीर देतो. हा संदेश देत अभिनय सादर केला. व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत माझ्या मुलाला प्रवेश घ्यायचा आहे हा हट्ट पालकाच्या भूमिकेत असलेल्या विद्यार्थ्यांचा दूर केला. जागतिक विज्ञान दिन साजरा करीत असताना इतर विषयांबरोबर गणित हा विषयही सोपा आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी गणितीय सूत्रांचा वापर करत उखाण्यातून गणितीय सूत्र सादर केले. जसे शंकराच्या पिंडी समोर उभा आहे नंदी. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, मी आणि मैत्रीण रोज खातो काजू चौरसाचे परिमिती चार गुणिले बाजू असे महत्वपूर्ण उखाणे घेतली .इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भवानी चौकामध्ये ग या गीतावर लेझीमचा ठेका घेत नृत्य सादर केले . शास्त्रज्ञांच्या वेशभूषेवर आलेल्या विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर करत कार्यक्रमाचा समारोप झाला .कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष पी .टी. धनविजय मुख्याध्यापक गुलाबराव पाटील व सुजाता नलावडे उपस्थित होते.