
जगद्गुरू तुकोबांच्या बीजनिमित्त कीर्तन सप्ताहाची सुरवात…
यावर्षी तुकोबांच्या संगीतमय चरित्राचे पारायण…
धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर
धरणगाव — येथील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने मागील ३५ वर्षांपासून संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले जाते.
यावर्षी देखील दि.२ मार्च ते ९ मार्च २०२३ दरम्यान हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न होणार आहे. यावर्षी प्रथमच संत तुकाराम महाराज संगीतमय चरित्राचे पारायण ह.भ.प. कैलास महाराज टेकवाडेकर यांच्या मधुर वाणीतून श्रोत्यांना श्रवणाचा लाभ मिळणार आहे. दु. १ ते ५ दरम्यान दररोज संगीतमय चरित्राचे पारायण होईल. दररोज रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान नामवंत किर्तनकारांचे कीर्तन ऐकण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. यामध्ये २ मार्च ला ह.भ.प.आदिनाथ महाराज जळकेकर, ३ मार्च ह.भ.प.आनंद महाराज बोरकुंडकर, ४ मार्च ह.भ.प.माधव महाराज कन्हेरेकर, ५ मार्च ह.भ.प.अतुल महाराज बेटावदकर, ६ मार्च ह.भ.प.मनोज महाराज कुलकर्णी जळगावकर, ७ मार्च ह.भ.प.दिनेश महाराज चिखलीकर, ८ मार्च ह.भ.प.कैलास महाराज टेकवाडेकर आणि ९ मार्च ला सप्ताहाचे संयोजक ह.भ.प.चत्रभुज महाराज (प्रा.सी.एस.पाटील सर) धरणगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. संत तुकाराम महाराज बीजनिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. लहान माळी वाडा परिसरातील संत तुकाराम महाराज चौक (माळी व पाटील समाज मढी) येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त कुणबी पाटील पंच मंडळाने केलेले असून सप्ताहाच्या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष, पंच मंडळ व समाज बांधवांनी केले आहे.